शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

ऊस बिलासाठी स्वाभिमानी आक्रमक: कारखानदारांच्या घरासमोर ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 15:14 IST

सातारा जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाचे बिल पूर्णपणे द्यावे, या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने कारखानदारांच्या घरासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.

ठळक मुद्देऊस बिलासाठी स्वाभिमानी आक्रमक: आंदोलन बेमुदत : कारखानदारांच्या घरासमोर ठिय्या

सातारा : जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाचे बिल पूर्णपणे द्यावे, या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने कारखानदारांच्या घरासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सातारा जिल्ह्यातील सन २०१९/२० मधील गळीत हंगामातील ऊसबिल दिले नाही. जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन ऊस बिल वसुली आंदोलन चालू केले. सुरुवातीला काही कारखानदारानी प्रतिसाद देत कोरोनाचे कारण सांगत मुदत मागितली संघटनेने ही मान्य केले व १० दिवसांची लेखी मुदत दिली परंतु आज १५ दिवस झाले तरी ही कारखानदारांनी टांग मारली.

साधा संपर्क सुध्दा केला नाही. आणि त्यात भरीस भर कोरोना संसर्ग सातारा जिल्ह्यात फोफावला आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाची दिशा बदलली आहे. शासकीय नियमाचे पालन करुन किसनवीर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांच्या सातारा येथील घरासमोरुन फक्त स्वाभिमानीचे ३ पदाधिकारी आंदोलनाला बसले आहेत.दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर लोकनेते बाळासाहेब देसाई कारखाना व कृष्णा कारखान्याने शेतकऱ्यांचे बिल दिले. मात्र, इतर कारखान्यांनी कोणतीच हालचाल केली नाही. साताऱ्यात मदन भोसले यांच्याशी चर्चा झाली मात्र कोणताच तोडगा निघाला नसल्याने आंदोलन सुरुच ठेवणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके, अर्जुन साळुंखे, तालुका अध्यक्ष रमेश पिसाळ यांनी दिली.

 

टॅग्स :Swabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाSugar factoryसाखर कारखानेSatara areaसातारा परिसर