मत्रेवाडीत युवकाचा संशयास्पद मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 05:03 IST2021-05-05T05:03:03+5:302021-05-05T05:03:03+5:30

ढेबेवाडी : पाटण तालुक्यातील मत्रेवाडी येथील शिवारात एका आंब्याच्या झाडाखाली युवकाचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळला. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत याबाबत ...

Suspicious body of a youth in Matrewadi | मत्रेवाडीत युवकाचा संशयास्पद मृतदेह

मत्रेवाडीत युवकाचा संशयास्पद मृतदेह

ढेबेवाडी : पाटण तालुक्यातील मत्रेवाडी येथील शिवारात एका आंब्याच्या झाडाखाली युवकाचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळला. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता. काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

याबाबत माहिती अशी की, डोंगरपठारावरील मत्रेवाडी गावातील भांगा नावाच्या शिवारात आंब्याच्या झाडाखाली एक युवक मृतावस्थेत पडल्याचे सोमवारी सकाळी गावकऱ्यांना निदर्शनास आले. त्यांनी याबाबत खात्री केली असता, तो मृतदेह गावातीलच अविनाश शंकर कोळेकर (वय २२) याचा असल्याचे स्पष्ट झाले. अविनाश याचे मूळ गाव कोळेकरवाडी असून, तो अनेक वर्षांपासून मत्रेवाडी येथे मामाच्या गावी वास्तव्यास होता. याची माहिती ढेबेवाडी पोलिसांना देण्यात आली. सकाळी दहाच्या सुमारास ढेबेवाडी पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी कऱ्हाड येथील कुटीर रुग्णालयात पाठविला. मात्र, घटनास्थळी पोलिसांना काही आक्षेपार्ह बाबी सापडल्याने, पोलिसांनी काही संशयितांनाही पोलीस ठाण्यात आणले. रात्री उशिरापर्यंत पोलीस चौकशी करत होते.

Web Title: Suspicious body of a youth in Matrewadi