वैद्यकीय अधिकाऱ्यांचे असहकार आंदोलन स्थगित

By Admin | Updated: June 7, 2014 00:11 IST2014-06-07T00:11:27+5:302014-06-07T00:11:40+5:30

मुख्यमंत्र्यांचे आश्वासन : मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा आंदोलन

Suspension of non-cooperation movement of medical officers | वैद्यकीय अधिकाऱ्यांचे असहकार आंदोलन स्थगित

वैद्यकीय अधिकाऱ्यांचे असहकार आंदोलन स्थगित

सातारा : जिल्ह्यातील विविध शासकीय रुग्णालयांतील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी सुरू केलेले असहकार आंदोलन मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. दरम्यान, दहा दिवसांत मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
महाराष्ट्र राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटना (मॅग्मो) यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात सोमवारपासून असहकार आंदोलन सुरू करण्यात आले होते. या आंदोलनात जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा आणि जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी सहभागी झाले होते. आंदोलनामुळे रुग्णालयातील यंत्रणा कोलमडल्याने रुग्णांना सेवेअभावी माघारी जावे लागण्याची वेळ आली होती. जिल्हा रुगाणलयात आलेल्या रुग्णांनाही याचा फटका बसला होता. जिल्ह्यातील २५० हून अधिक वैद्यकीय अधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी संघटनेच्या मागण्यांवर उपाययोजना बनविण्याचे आश्वासन दिल्यानंतर संघटने द्वारा आंदोलन मागे घेण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: Suspension of non-cooperation movement of medical officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.