दुसरी सून तिचा छळ करणारा पोलीस निलंबित

By Admin | Updated: April 29, 2017 21:31 IST2017-04-29T21:31:37+5:302017-04-29T21:31:37+5:30

मुलाचे दुसरे लग्न लावून फसवणूक केल्याचा ठपका ठेवून भुर्इंज पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक गणेश कदम यांना जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी निलंबित केले.

Suspended police torture her in the second row | दुसरी सून तिचा छळ करणारा पोलीस निलंबित

दुसरी सून तिचा छळ करणारा पोलीस निलंबित

 ऑनलाईन लोकमत

सातारा, दि. 29 - मुलाचे  दुसरे लग्न लावून फसवणूक केल्याचा ठपका ठेवून भुर्इंज पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक गणेश कदम यांना जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी निलंबित केले.गणेश कदम हे भुर्इंज पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. त्यांना कायद्याचे चांगले ज्ञान असतानाही त्यांनी त्यांच्या मुलाचा दुसरा विवाह शीतल कदम यांच्याशी लावून मुलीची फसवणूक केली. शीतल कदम या सासरी नांदायला आल्या असता त्यांचा शारीरिक व मानसिक छळ केला. 
 
शीतल कदम यांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असता पोलीस उपनिरीक्षक गणेश कदम यांनी तपासी अंमलदार यांच्यावर दबाव आणला. त्यामुळे पुढील कारवाई होत नसल्याचा तक्रार अर्ज शीतल कदम यांनी केला होता. 
गणेश कदम हे पदाचा दुरुपयोग करून अत्यंत गंभीर स्वरुपाचे गैरवर्तन करीत असल्याने त्यांना निलंबित करून त्यांची खातेनिहाय चौकशीचे आदेश पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Suspended police torture her in the second row