विश्रामगृहात झोपून अर्ज घेणारा हवालदार निलंबित

By Admin | Updated: March 6, 2017 23:44 IST2017-03-06T23:44:29+5:302017-03-06T23:44:29+5:30

विश्रामगृहात झोपून अर्ज घेणारा हवालदार निलंबित

Suspended constable suspended in the lodging room | विश्रामगृहात झोपून अर्ज घेणारा हवालदार निलंबित

विश्रामगृहात झोपून अर्ज घेणारा हवालदार निलंबित


दहिवडी : तक्रार दाखल करण्यास आलेल्या महिलेला अपमानास्पद वागणूक देऊन तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी दहिवडी पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदार चंद्रहार राक्षे याचे पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी निलंबन केले आहे.
याबाबत माहिती अशी की, दहिवडी पोलिस ठाण्यात एक महिला तक्रार देण्यासाठी गेली होती. त्यावेळी पोलिस हवालदार चंद्रहार राक्षे त्या ठिकाणी हजर नव्हता. तसेच त्याने तक्रार घेण्यासाठी पोलिस ठाण्यात येण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे संबंधित महिला पोलिस ठाणे परिसरातीलच विश्रामगृहामध्ये विश्रांती घेत असलेल्या राक्षे याच्याकडे तक्रार देण्यासाठी गेली. त्या ठिकाणी हवालदार राक्षे झोपलेला होता. त्याने तक्रार झोपेतून उठून घेण्याऐवजी झोपूनच तक्रार अर्ज वाचला व तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ केली. त्या महिलेस अपमानास्पद वागणूक देऊन हुसकावून लावून पुन्हा झोपी
गेला.
संबंधित महिलेने याबाबत नातेवाइकांसोबत पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांची भेट घेऊन चित्रफितीसह हकिकत सांगितली. त्यामुळे संदीप पाटील यांनी पोलिस हवालदार राक्षे याचे निलंबन करून पोलिस निरीक्षक, सातारा शहर पोलिस ठाणे यांना खातेनिहाय चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. (वार्ताहर)

Web Title: Suspended constable suspended in the lodging room

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.