अधिकारी मृत्यूप्रकरणी संशयितांना शनिवारपर्यंत पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:40 IST2021-03-17T04:40:27+5:302021-03-17T04:40:27+5:30

वडूज : पडळ (ता. खटाव) येथील खटाव-माण अँग्रो प्रोसिसिंग पडळ या साखर कारखान्यावरील केमिस्ट अधिकारी जगदीप थोरात यांच्या ...

Suspects in officer death case remanded to police custody till Saturday | अधिकारी मृत्यूप्रकरणी संशयितांना शनिवारपर्यंत पोलीस कोठडी

अधिकारी मृत्यूप्रकरणी संशयितांना शनिवारपर्यंत पोलीस कोठडी

वडूज : पडळ (ता. खटाव) येथील खटाव-माण अँग्रो प्रोसिसिंग पडळ या साखर कारखान्यावरील केमिस्ट अधिकारी जगदीप थोरात यांच्या मृत्यूप्रकरणी सातजणांना शनिवार (दि. २० मार्च)पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश वडूज न्यायालयाने दिले आहेत.

जगदीप थोरात (रा. गोवारे, ता. कऱ्हाड) यांच्या मृत्यूप्रकरणी वडूज पोलिसांनी मनोज घोरपडे,

संग्राम घोरपडे, सनी क्षीरसागर,

रणजीत सूर्यवंशी, शुभम घाडगे, रोहित कोलुगडे, अंजनकुमार घाडगे यांना यापूर्वी न्यायालयाने दि. १६ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. मंगळवारी, दि. १६ रोजी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना शनिवार, दि. २० पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

उर्वरित संशयितांना ताब्यात घेण्यासाठी पोलीस पथके रवाना झाले आहेत.

Web Title: Suspects in officer death case remanded to police custody till Saturday