शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई: वाशीत कारमध्ये १६ लाख रुपयांची रोकड सापडली, आचारसंहिता पथकाची कारवाई
2
"पंतप्रधान मोदी यांनी ट्रम्प यांना वेळीच फोन केला असता तर...!"; अमेरिकन वाणिज्यमंत्र्याचा मोठा खुलासा
3
'स्टॉपेज रेशो'ने वाढवली धाकधूक! गुंतवणूकदार म्यॅुच्युअल फंडातून का पडतायत बाहेर?
4
सबरीमाला मंदिरातील सोन्याच्या चोरी प्रकरणी मुख्य पुजारी ताब्यात, एसआयटीची कारवाई   
5
एस जयशंकर यांना अमेरिकेत करावा लागला रस्त्याने ६७० किमी प्रवास; बलाढ्य अमेरिकेवर ट्रम्प यांनी ही काय वेळ आणली...
6
‘महायुती सत्तेवर आली तरी मुंबईचं बॉम्बे होणार नाही, पण उद्धव ठाकरे सत्तेवर आले तर...’, नितेश राणेंचा दावा 
7
कर्जबाजारी पाकिस्तानचा ओव्हर कॉन्फिडन्स; फायटर जेट विकून IMF चे कर्ज फेडण्याचा दावा
8
केवळ एकच व्हिडीओ, अन् यूट्युबवर लावली ‘आग’, केली ९ कोटींची कमाई, नेमकं काय आहे त्यात? 
9
PMC Election 2026: शिवसेना स्वबळावर लढत आहे, म्हणून कुणीही हलक्यात घेऊ नका; एकनाथ शिंदेंचा इशारा
10
"इम्तियाज जलील हा भाजपाचा हस्तक, त्याने शहराला..."; ठाकरेंच्या नेत्याचा घणाघात, फडणवीसांवरही 'बाण'
11
डोनाल्ड ट्रम्प यांची आर्थिक 'दादागिरी'? उदय कोटक यांनी २०२४ मध्येच केली होती भविष्यवाणी
12
स्टार क्रिकेटर Jasprit Bumrah चा 'रशियन सुंदरी' सोबतचा फोटो व्हायरल; कोण आहे 'ही' तरुणी?
13
Chanakya Niti: अपमान करणाऱ्याला कसं उत्तर द्यायचं? शिका चाणक्य नीतीचे 'हे' ५ वाग्बाण 
14
मोठा निष्काळजीपणा! नर्सने कापला दीड महिन्याच्या बाळाचा अंगठा, नेमकं काय घडलं?
15
० ० ० ० ० ० ... ६ चेंडूत हव्या होत्या ६ धावा... महाराष्ट्राचा 'जादूगार' रामकृष्णने जिंकवली मॅच
16
तुमचा iPhone हॅक तर झाला नाही ना? 'या' ४ गोष्टी दिसताच समजा कुणीतरी करतंय तुमची हेरगिरी
17
इराणच्या 'या' निर्णयाचा भारताला मोठा फटका, 2000 कोटी रुपयांवर आडलं घोडं...! काय आहे संपूर्ण प्रकरण?
18
भारतीय क्रिकेट विश्वावर शोककळा; मैदानावरच फलंदाजाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
19
Malegaon Municipal Election 2026 : भाजपच्या दोन बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी, वरिष्ठांच्या आदेशान्वये कारवाई
20
अपघातग्रस्तावर मोफत उपचार! मदत करणाऱ्याला ₹25 हजारांचे बक्षीस; मोदी सरकार आणतेय नवीन योजना
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत बसून सातारच्या कायदा सुव्यवस्थेची अंधारेंनी काळजी करू नये, शंभूराज देसाईंनी लगावला टोला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 18:06 IST

'त्या ड्रग्ज प्रकरणाशी एकनाथ शिंदे व परिवाराचा संबंध नाही'

कराड : सातारा जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था अतिशय व्यवस्थित आहे. सुषमा अंधारे यांना मुंबईत माध्यमांसमोर बोलायला काय जातंय? असा उलट प्रश्न करीत आम्ही स्वतः जनमानसात असतो. त्यामुळे उगाच मुंबईत बसून सुषमा अंधारे यांनी साताऱ्याच्या कायद्या सुव्यवस्थेची काळजी करू नये, असा टोला पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी माध्यमांशी बोलताना लगावला.कराड येथे मंगळवारी मंत्री देसाईंनी नगरपालिकेत आढावा बैठक घेतली. त्यानंतर नगरपालिका आवारात मंत्री शंभूराज देसाई यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी माजी आमदार बाळासाहेब पाटील, नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांची उपस्थिती होती.देसाई म्हणाले, ‘कराड पालिका निवडणूक प्रचारादरम्यान लागेल ती मदत करणार व निधी कमी पडू देणार नाही, असा शब्द दिला होता. कराडकरांनी आमच्या पक्षाच्या राजेंद्रसिंह यादव यांना नगराध्यक्षपदी निवडून दिले आहे. म्हणूनच आज आढावा बैठक घेतली. त्यात यापूर्वी दिलेल्या निधींच्या कामाची काय स्थिती आहे याची माहिती घेऊन योग्य त्या सूचना केल्या.’त्यामुळे निमंत्रण नव्हतेशासकीय आढावा बैठकीला भाजपच्या नगरसेवकांना निमंत्रण नव्हते, याकडे लक्ष वेधले असता मंत्री देसाई म्हणाले, ‘ही फक्त प्रशासकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक होती. त्यामुळे नगराध्यक्ष होते, पण कोणत्याही नगरसेवकांना व्यक्तिगत निमंत्रण दिले गेले नव्हते.’मग तुम्ही कसा तर्क लावताय?ठाण्यात ''ते'' पापाचा पैसा वाटायला आलेत अशी टीका गणेश नाईक यांनी केली आहे. याबाबत मंत्री देसाई यांना छेडले असता, त्यांनी कोणाचेही नाव घेतलेले नाही. मग तुम्ही हा प्रश्न आम्हाला विचारून कसा तर्क लावताय? असा सवाल माध्यमांच्या प्रतिनिधींना त्यांनी केला.ते दोघे भाऊ-बहीण आहेतएकनाथ शिंदे म्हणजे ठाण्याचे रहमान डकैत आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. याकडे लक्ष वेधले असता, अंधारे आणि राऊत हे दोघे भाऊ-बहीण आहेत. त्यांनी टीका करण्यापेक्षा आपली शिवसेना कितव्या नंबरला आहे हे तपासावे, असा सल्ला मंत्री देसाई यांनी दिला.त्या ड्रग्ज प्रकरणाशी एकनाथ शिंदे व परिवाराचा संबंध नाहीसातारा जिल्ह्यात सापडलेल्या ड्रग्ज प्रकरणातील ओंकार डिगे कुठे गायब झाला आहे? हे ड्रग्ज नेमके कोणाच्या रिसॉर्ट्सवर सापडले? असा सवाल सुषमा अंधारे करीत आहेत. याबाबत विचारले असता, त्या ड्रग्ज प्रकरणाशी एकनाथ शिंदे व त्यांच्या कुटुंबीयांचा कुठलाही संबंध नाही. पोलिस त्याचा व्यवस्थित तपास करीत आहेत, असे मंत्री देसाई यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Desai to Andhare: Don't worry about Satara from Mumbai.

Web Summary : Shambhuraj Desai criticized Sushma Andhare, stating Satara's law and order is well-maintained. He dismissed her concerns as she resides in Mumbai. Desai addressed Karad's municipal issues, assuring funds and support for development projects. He defended Eknath Shinde regarding drug allegations.