सुशांत पवार याची व्हिएतनाम शिपिंगसाठी निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:14 IST2021-02-06T05:14:23+5:302021-02-06T05:14:23+5:30
मर्चंट नेव्ही अधिकारी प्रशिक्षणाबाबत मार्गदर्शन करणाऱ्या येथील आरके मरीन करिअर अकॅडमीचा विद्यार्थी सुशांत शंकर पवार याची एस शिप ...

सुशांत पवार याची व्हिएतनाम शिपिंगसाठी निवड
मर्चंट नेव्ही अधिकारी प्रशिक्षणाबाबत मार्गदर्शन करणाऱ्या येथील आरके मरीन करिअर अकॅडमीचा विद्यार्थी सुशांत शंकर पवार याची एस शिप मॅनेजमेंटच्या वतीने व्हिएतनाम येथे ऑफिसर पदावर निवड झाली आहे. त्याच्या या निवडीबद्दल अकॅडमीचे संचालक राहुलकुमार खडके यांनी त्याचा सत्कार केला.
सुशांत याने कृष्णा कॉलेज कराड येथे शिक्षण घेतले. तर बीएस्सी नॉटिकल सायन्स हा शिपिंगचा अभ्यासक्रम इंटरनॅशनल मेरीटाइम अकॅडमी चेन्नई ,तमिळनाडू येथून खडके यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केला. परदेशात जहाजावर अधिकारी म्हणून काम करण्याचे त्याचे लहानपणापासून स्वप्न होते. शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी असल्याने अनेक अडचणी होत्या मात्र, कुटुंबीयांचे पाठबळ आणि आर के मरीनचे सहकार्य यामुळे हे यश मिळाल्याचे सुशांत पवार सांगतो .
आर के मरीन अकॅडमीच्या मार्गदर्शनाखाली आजवर २००० हून अधिक जण परदेशी शिपिंग कंपनीमध्ये अधिकारी पदावर कार्यरत आहेत. या अकॅडमी मुळेच माझ्या मुलाचे स्वप्न पूर्ण झाले; अशी प्रतिक्रिया पालक शंकर पवार यांनी व्यक्त केली.
सुशांत पवार यांना राहुलकुमार खडके यांनी सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ देऊन त्याचा सत्कार केला. विठ्ठलराव खडके यांच्या हस्ते त्याला विमान तिकीट व व्हिसा देण्यात आला. यावेळी हनुमंत कुंभवडे ,संगीता पवार, ऋतिक कुंभवडे, प्रशांत पवार, तेजस बंके ,डॉ. प्रवीण माने, विराज बोराडे, विनायक माने, संग्राम यादव यांची उपस्थिती होती. (वा प्र )
---------------------------
फोटो :पाठवत आहे.
फोटो ओळ: कराड येथे सुशांत पवार याचा सत्कार करताना राहुलकुमार खडके