मैदानी स्पर्धेत सुशांत जेधेला रौप्यपदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:41 IST2021-02-11T04:41:02+5:302021-02-11T04:41:02+5:30
वाई : भोपाळ (मध्यप्रदेश) येथील तात्या टोपे स्टेडियम येथे चालू असलेल्या १८ व्या फेडरेशन चषक कनिष्ठ मैदानी स्पर्धेत मांढरदेव ...

मैदानी स्पर्धेत सुशांत जेधेला रौप्यपदक
वाई : भोपाळ (मध्यप्रदेश) येथील तात्या टोपे स्टेडियम येथे चालू असलेल्या १८ व्या फेडरेशन चषक कनिष्ठ मैदानी स्पर्धेत मांढरदेव येथील सुशांत जेधे याने दहा हजार मीटर धावणे स्पर्धेत रौप्यपदक मिळवून महाराष्ट्राला पदकांचे खाते उघडून दिले. सुशांतने राज्याचे प्रतिनिधित्व करताना ३१.२२ मि. वेळ नोंदवत रौप्यपदक मिळवले. या स्पर्धेत राज्याबरोबर इतर २५ राज्यांनी सहभाग घेतला होता
वेलंग (ता. वाई) येथील रहिवासी असणारा सुशांत हा वाई येथील किसनवीर कॉलेजमध्ये बारावीत शिकत आहे. मांढरदेव येथील मांढरदेवी ॲथलेटिक्स फौंडेशनमध्ये तो सराव करतो. त्याला क्रीडा मार्गदर्शक राजगुरू कोचळे व धोंडिराम वाडकर यांचे मार्गदर्शन लाभले. सुशांतच्या या यशाबद्दल सातारा जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष पांडुरंग शिंदे, जिल्हा क्रीडाधिकारी युवराज नाईक, मांढरदेव ग्रामस्थ, दुकानदार व सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.
फोटो आहे..
१० सुशांत जेधे