सुरूपखानवाडी शाळेचे उपक्रम कौतुकास्पद : बाबासाहेब पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:41 IST2021-09-18T04:41:34+5:302021-09-18T04:41:34+5:30
म्हसवड : कोरोना काळात शाळा बंद; पण शिक्षण चालू हे वाक्य डोक्यात घेऊन दररोज सकाळ-संध्याकाळ ऑनलाईन अध्यापन, प्रत्यक्ष ...

सुरूपखानवाडी शाळेचे उपक्रम कौतुकास्पद : बाबासाहेब पवार
म्हसवड : कोरोना काळात शाळा बंद; पण शिक्षण चालू हे वाक्य डोक्यात घेऊन दररोज सकाळ-संध्याकाळ ऑनलाईन अध्यापन, प्रत्यक्ष गृहभेटी घेऊन विद्यार्थ्यांना वैयक्तिक पातळीवर मार्गदर्शन व विद्यार्थांचे गट करून मुलांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी सर्व शिक्षक अत्यंत प्रामाणिकपणे ज्ञानार्जनाचे कार्य करीत असल्याने सुरूपखानवाडी शाळेचे कार्य कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब पवार यांनी केले.
जिल्हा परिषद शाळा सुरूपखानवाडी (ता. माण) येथे शालेय खोल्यांचञया नूतनीकरणाचा प्रारंभ बाबासाहेब पवार व पंचायत समिती सदस्या कविता जगदाळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सरपंच सुरेखा जाधव आणि पोलीस पाटील राजेश कदम यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
शाळेच्या नेत्रदीपक प्रगतीबाबत मुख्याध्यापिका वर्षा देवकर यांनी माहिती दिली. कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य तानाजी मगर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष धनाजी आवळे, दादासाहेब चोपडे, जगन्नाथ इंदलकर, हिम्मत कदम, विठ्ठल खराडे, आनंदराव इंदलकर, हनुमंत खराडे, गणेश सत्रे, शिवाजी कुंभार, युनूस मोगल, सोनाली विभुते, केंद्रप्रमुख नारायण आवळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे विनोद शीलवंत यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी वर्षा देवकर, मनीषा ननावरे, दिलीप गंबरे यांनी परिश्रम घेतले.