शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

चोरीचे सोने विकत घेणाऱ्या सराफास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 16:16 IST

चोरीचे सोने विकत घेणाऱ्या दशरथ चांगदेव घाडगे (रा. रहिमतपूर, ता. कोरेगाव) या सराफास बोरगाव पोलिसांनी सोमवारी दुपारी अटक केली. त्याच्याकडून तब्बल ९ तोळ्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत.

ठळक मुद्देचोरीचे सोने विकत घेणाऱ्या सराफास अटकनऊ तोळे सोने जप्त : बोरगाव पोलिसांची कारवाई

सातारा/ रहिमतपूर : चोरीचे सोने विकत घेणाऱ्या दशरथ चांगदेव घाडगे (रा. रहिमतपूर, ता. कोरेगाव) या सराफास बोरगाव पोलिसांनी सोमवारी दुपारी अटक केली. त्याच्याकडून तब्बल ९ तोळ्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, काशीळ, ता. सातारा येथील गुलाब महमंद महिबुब भालदार यांच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी १७ जुलै २०१९ रोजी चोरी करून चार लाखांची रोकड आणि १६ तोळ्यांचे दागिने चोरून नेले होते. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखा आणि बोरगाव पोलीस संयुक्तपणे करत होते.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी पोलिसांनी या चोरीप्रकरणी चिकनेस उर्फ चिकण्या टिगर पवार (रा. वाठार, किरोली, ता. कोरेगाव) याला अटक केली होती. त्याने काशीळ येथील चोरीची कबुली दिली होती.

चोरीचे सोने त्याने रहिमतपूर येथील दशरथ घाडगे या सराफाला विकल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी सोमवारी दुपारी दशरथ घाडगे या सराफाला अटक केली. त्याच्याकडून चोरीचे नऊ तोळे सोने जप्त करण्यात आले आहे.

अद्याप ७ तोळ्याचा थांगपत्ता पोलिसांना लागला नाही. पोलीस त्याच्याकडे कसून चौकशी करत आहेत. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत माळी, पोलीस उपनिरीक्षक वर्षा डाळींबकर यांच्या मार्गदर्शखाली सहायक फौजदार चंद्रकांत कुंभार, राजू शिखरे, किरण निकम आदींनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसरPoliceपोलिस