कुडाळ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुरेखा कुंभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:41 IST2021-02-09T04:41:53+5:302021-02-09T04:41:53+5:30
कुडाळ : जावळी तालुक्यातील कुडाळ ग्रामपंचायतीची निवडणूक जिल्ह्यात लक्षवेधी ठरली होती. सोमवारी झालेल्या सरपंच निवडणुकीत रयत पॅनल व बहुजन ...

कुडाळ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुरेखा कुंभार
कुडाळ : जावळी तालुक्यातील कुडाळ ग्रामपंचायतीची निवडणूक जिल्ह्यात लक्षवेधी ठरली होती. सोमवारी झालेल्या सरपंच निवडणुकीत रयत पॅनल व बहुजन विकास आघाडीची युती होऊन सरपंचपदी रयत पॅनलच्या सुरेखा निवृत्ती कुंभार, तर उपसरपंचपदी बहुजन विकास आघाडीच्या सोमनाथ लक्ष्मण कदम यांची बिनविरोध निवड झाली.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडलाधिकारी प्रकाश गाढवे यांनी काम पाहिले. सरपंच व उपसरपंचपदाच्या निवडीसाठी नवनिर्वाचित सदस्यांची विशेष बैठक बोलावण्यात आली होती. यामध्ये या बिनविरोध निवडी जाहीर करण्यात आल्या. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करत जेसीबीच्या साह्याने गुलालाची उधळण करून नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, सदस्य व पॅनलप्रमुखांचे स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी जावळी शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र शिंदे, प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे संचालक मालोजीराव शिंदे, माजी सरपंच जितेंद्र शिंदे, गणपत कुंभार, संजय शिंदे, हेमंत शिंदे, शिवाजीराव शेवते, धनंजय केंजळे, दत्तात्रय रासकर, विलासराव कांबळे आदी उपस्थित होते.
०८कुडाळ
कुडाळच्या नूतन सरपंच व उपसरपंच यांचे उपसभापती सौरभ शिंदे यांनी कौतुक केले. यावेळी राजेंद्र शिंदे, मालोजीराव शिंदे, जितेंद्र शिंदे, हेमंत शिंदे, नूतन सदस्य आदी उपस्थित होते.