रुग्णवाहिका मिळाल्याने ग्रामस्थांना आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:28 IST2021-05-31T04:28:08+5:302021-05-31T04:28:08+5:30

वाठार स्टेशन : वाठार स्टेशन प्राथमिक आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका द्या, अशी वेळोवेळी मागणी करूनही वाठार स्टेशनला रुग्णवाहिका दिली ...

Support to the villagers by getting an ambulance | रुग्णवाहिका मिळाल्याने ग्रामस्थांना आधार

रुग्णवाहिका मिळाल्याने ग्रामस्थांना आधार

वाठार स्टेशन : वाठार स्टेशन प्राथमिक आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका द्या, अशी वेळोवेळी मागणी करूनही वाठार स्टेशनला रुग्णवाहिका दिली जात नव्हती. त्यानंतर फलटण, कोरेगाव मतदार संघाचे शिवसेना क्षेत्रप्रमुख अमोल आवळे यांनी आंदोलनाचा इशारा देताच वाठार प्राथमिक आरोग्य केंद्राला नवीन रुग्णवाहिका देण्यात आली. यामुळे ग्रामस्थांना मोठा आधार मिळाला आहे.

मोठ्या लोकसंख्येचे गाव तसेच मोठी बाजारपेठ असलेल्या कोरगाव तालुक्यातील वाठार स्टेशन येथे जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्र राष्ट्रीय महामार्गाजवळ आहे. त्यामुळे या आरोग्य केंद्रात सतत गर्दी असते. रस्त्यावर सतत अपघात होत असतात, अशी परिस्थिती असताना दोन वर्षांपूर्वी येथील रुग्णवाहिका पेटली होती. तेव्हापासून या केंद्रास रुग्णवाहिका मिळावी, यासाठी अनेक जण प्रयत्न करत होते. अमोल आवळे यांनीही रुग्णवाहिका मिळावी अन्यथा आंदोलन करू, असा इशारा दिला होता. याची दखल घेऊन वाठार आरोग्य केंद्रास रुग्णवाहिका देण्यात आली आहे.

Web Title: Support to the villagers by getting an ambulance