अंधश्रद्धेमुळे तरुण मुलीचा गेला जीव; तर अनेक झाले कंगाल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:43 IST2021-08-25T04:43:17+5:302021-08-25T04:43:17+5:30

सागर गुजर सातारा : विज्ञानाने कितीही प्रगती केली असली, तरी अनेकांच्या डोक्यात असलेले अंधश्रद्धेचे भूत उतरायला तयार नाही. दहिवडी ...

Superstition kills young girl; So many became poor! | अंधश्रद्धेमुळे तरुण मुलीचा गेला जीव; तर अनेक झाले कंगाल!

अंधश्रद्धेमुळे तरुण मुलीचा गेला जीव; तर अनेक झाले कंगाल!

सागर गुजर

सातारा : विज्ञानाने कितीही प्रगती केली असली, तरी अनेकांच्या डोक्यात असलेले अंधश्रद्धेचे भूत उतरायला तयार नाही. दहिवडी येथील तरुण मुलीचा जीव गेला, तर अनेकजणांनी मांत्रिकाच्या भूलथापांना फसून पैसा जमीन-जुमला गमावला आहे.

२१ व्या शतकातदेखील लोकांच्या वैज्ञानिक जाणिवा तसेच विवेकवाद आणि निर्भयपणा जागृत होत नाही. भीतीपोटी अवसान गाळून बसणारे लोक मांत्रिकांच्या भूलथापांना फसत आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने मात्र अशा बुवांचा बंदोबस्त करण्याचा प्रयत्न सुरू ठेवलेला आहे. जादू-टोणाविरोधी कायद्यामुळे अंनिसच्या या कार्याला बळ मिळाले आहे. तरीही लोकांनी निर्भयपणे फसवणुकीबाबत तक्रार करणे आवश्यक आहे.

या बातमीत खालील मुद्दे अपेक्षित आहेत.

१) २०१३मध्ये झाला कायदा

अंधश्रद्धा निर्मूलन कायदा २६ ऑगस्ट २०१३ पासून राज्यात अंमलात आला. राज्यपालांची स्वाक्षरी झाल्यानंतर गेल्या आठ वर्षांपासून हा कायदा लागू झाला आहे.

२) आठ वर्षांत ७५ गुन्हे दाखल

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने जादू-टोणाविरोधी कायद्याअंतर्गत संपूर्ण राज्यभरात ७५ गुन्हे गेल्या आठ वर्षांमध्ये दाखल केले आहेत. सातारा जिल्ह्यातदेखील अंधश्रद्धा निर्मूलन समितीने बुवाबाजी करणाऱ्या लोकांवर वचक ठेवला आहे.

३) भानामती कसली, हे तर खेळ विज्ञानाचे

१ ) अंधश्रद्धेमुळे दहिवडी येथील चौदा वर्षांच्या मुलीला नाहक जीव गमवावा लागला. या मुलीचे पालक तिला घेऊन दोन मांत्रिकाकडे गेले होते. अमावास्येच्या रात्री बारा वाजता या मुलीवर बसलेले भूत उतरेल, असं या मांत्रिकाने सांगितलं होतं, त्यामुळे घरातील लोक या मुलीभोवती रिंगण करून बसले होते. तिथेच तिने प्राण सोडला. वास्तविक या मुलीला निमोनिया झाला होता. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये त्याचा उल्लेख आहे. योग्यवेळी उपचार न झाल्याने या मुलीला प्राण गमवावे लागले.

२) खंडाळा तालुक्यातील पाडेगाव येथे एक मांत्रिक भूतबाधा काढतो, असा बनाव करत होता. तब्बल १३ वर्षे लोकांची फसवणूक सुरू होती. भूतबाधा उतरवतो, असे सांगून लोकांकडून पैसे घेणे, अन्नदान करून घेणे, अशी फसवणूक करत होता. उपअधीक्षक धीरज घाडगे यांच्या सहकार्याने अंनिसने मांत्रिकाविरोधात गुन्हा दाखल केला.

४) अंधश्रद्धा निर्मूलन समिती पदाधिकाऱ्याचा कोट

महाराष्ट्रामध्ये जादूटोणाविरोधी कायदा झाला, त्यासाठी डॉ. दाभोलकर यांना प्राण गमवावे लागले. लोकांमध्ये वैज्ञानिक विचारांचा अभाव असल्यामुळे मांत्रिक लोक लाभ घेतात. कुठेही अशाप्रकारचा अनुचित प्रकार घडत असेल, तर त्याची माहिती लोकांनी निर्भयपणे अंनिसला दिली पाहिजे. अनिस जी लागेल ती कायदेशीर मदत करेल.

- प्रशांत पोतदार, राज्य कार्यकारिणी सदस्य, अंनिस

Web Title: Superstition kills young girl; So many became poor!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.