पोलीस अधीक्षकांकडून अपघातस्थळाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:07 IST2021-02-05T09:07:34+5:302021-02-05T09:07:34+5:30

पुणे-कात्रज येथील मित्र कारमधून गोव्याला फिरायला गेले होते. गोव्यावरून येताना त्यांनी कोल्हापुरात महालक्ष्मीचे दर्शन घेतले. त्यानंतर पुण्याकडे जात असताना ...

Superintendent of Police inspects the accident site | पोलीस अधीक्षकांकडून अपघातस्थळाची पाहणी

पोलीस अधीक्षकांकडून अपघातस्थळाची पाहणी

पुणे-कात्रज येथील मित्र कारमधून गोव्याला फिरायला गेले होते. गोव्यावरून येताना त्यांनी कोल्हापुरात महालक्ष्मीचे दर्शन घेतले. त्यानंतर पुण्याकडे जात असताना त्यांच्या कारने नारायणवाडी-पाचवडफाटा हद्दीत दुस-या कारला धडक दिली. या अपघातात राहुल प्रल्हाद दोरगे (वय २८, रा. दौंड जि. पुणे) स्वप्नील चंद्रकांत शिंदे (वय २९, रा. शिंदेवाडी ता. फलटण जि. सातारा), रविराज रामचंद्र साळुंखे (वय २८, रा. कात्रज पुणे) हे जागीच ठार झाले. तर नऊ जण जखमी झाले. अपघातातील जखमींचे जबाब नोंदवण्याचे काम सोमवारी दिवसभर सुरू होते. याप्रकरणी भरत गुलाब ओमासे (वय ४३ रा. कळस ता. इंदापूर जि. पुणे) यांनी कऱ्हाड ग्रामीण पोलिसात खबर दिली आहे.

फोटो : ०१केआरडी०८

कॅप्शन : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पाचवडफाटा येथील अपघातस्थळाची सोमवारी जिल्हा पोलीसप्रमुख अजयकुमार बन्सल यांनी पाहणी केली.

Web Title: Superintendent of Police inspects the accident site

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.