‘राष्ट्रवादी’च्या प्रदेश उपाध्यक्षपदी सुनील खत्री
By Admin | Updated: August 27, 2014 23:30 IST2014-08-27T21:26:32+5:302014-08-27T23:30:45+5:30
पक्ष कार्यालयात खत्री यांना नियुक्तीपत्र प्रदान केले.

‘राष्ट्रवादी’च्या प्रदेश उपाध्यक्षपदी सुनील खत्री
कोरेगाव : सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष व जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य सुनील खत्री यांची पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री शशिकांत शिंदे व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पक्ष कार्यालयात खत्री यांना नियुक्तीपत्र प्रदान केले.
खत्री हे पवार निष्ठ कार्यकर्ते समजले जातात. एस. काँग्रेस पासून ते शरद पवार यांच्याबरोबर काम करत आहेत. त्यांनी पक्ष संघटनेत आजवर विविध पदे भूषविली आहेत. नियोजन समिती सदस्य म्हणूनही त्यांची उल्लेखनीय कामगिरी आहे.
या निवडीबद्दल विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, ग्रामीण विकासमंत्री जयंत पाटील, पालकमंत्री शशिकांत शिंंदे, राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष रामराजे नाईक-निंबाळकर, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन लक्ष्मणराव पाटील आदींसह आमदार, पदाधिकारी, अधिकारी व कार्यकर्त्यांनी सुनील खत्री यांचे कौतुक केले. (प्रतिनिधी)