कोरोनामुळे सुखेड वडजाई देवी यात्रा ‍रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:52 IST2021-02-25T04:52:18+5:302021-02-25T04:52:18+5:30

लोणंद : प्रशासनाच्या आदेशानुसार यावर्षी रविवारी (दि. २८) होणारी खेड बुद्रुक व सुखेड येथील वडजाई देवीची यात्रा रद्द ...

Sukhed Wadjai Devi Yatra canceled due to corona | कोरोनामुळे सुखेड वडजाई देवी यात्रा ‍रद्द

कोरोनामुळे सुखेड वडजाई देवी यात्रा ‍रद्द

लोणंद : प्रशासनाच्या आदेशानुसार यावर्षी रविवारी (दि. २८) होणारी खेड बुद्रुक व सुखेड येथील वडजाई देवीची यात्रा रद्द करण्याचा निर्णय या ठिकाणच्या ग्रामस्थांनी घेतला आहे. यावेळी लोणंद पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष चौधरी व खेड बुद्रुक ग्रामपंचायतीचे सरपंच गणेश धायगुडे-पाटील, सुखेड ग्रामपंचायतीचे सरपंच भीमराव धायगुडे-पाटील, सुखेड गावचे पोलीसपाटील रमेश धायगुडे-पाटील, सखाराम धायगुडे, मोहन धायगुडे, मोहन जमदाडे, ग्रामपंचायत सदस्य नारायण धायगुडे-पाटील, सुभाष ठोंबरे, राजेंद्र हाके, अनिल रासकर, सचिन वायदंडे, रामदास हाके, सुनील रासकर, जांलिदर धायगुडे, मुगट चव्हाण, सुखेडचे संदीप धायगुडे, अंकुश धायगुडे, संतोष धायगुडे, बाळासाहेब धायगुडे, खेड, सुखेड वडजाई देवी मानकरी, पुजारी, ग्रामपंचायत पदाधिकारी, माजी सरपंच, माजी उपसरपंच, तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वांनी मास्कचा वापर करून आपले गाव व तालुका कोरोनामुक्त करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन खेड बुद्रुक गावचे सरपंच गणेश धायगुडे-पाटील यांनी केले आहे.

Web Title: Sukhed Wadjai Devi Yatra canceled due to corona