लिंबचे सुजित शिंदे रेल्वेत उद्घोषक

By Admin | Updated: June 27, 2016 00:37 IST2016-06-26T23:04:21+5:302016-06-27T00:37:43+5:30

ते दोन-अडीच वर्षांचे असताना औषधाचा दुष्परिणाम होऊन त्यांच्या एका डोळ्याची दृष्टी गेली

Sujhit Shinde Rallylit Announcer of Limbo | लिंबचे सुजित शिंदे रेल्वेत उद्घोषक

लिंबचे सुजित शिंदे रेल्वेत उद्घोषक

जगदीश कोष्टी--सातारा --रेल्वे स्टेशनवर इलेक्ट्रॉनिक्स फलक लावलेले असतात... वेळापत्रक लिहिलेले असते.. तरीही माणसं गोंधळून जातात. समोर येतील त्याला अमूक रेल्वे कधी येणार... कुठल्या फलाटावर येते याची सतत विचारपूस करतात; पण सर्वांना दिशा देण्याचं काम लिंब येथील सुजित शिंदे हे दृष्टिहीन तरुण करत आहे. सातारा रेल्वे स्टेशन गाडी येण्याची, जाण्याची वेळ, फलाट क्रमांकाची माहिती ध्वनिक्षेपकावरून दिली जाते. हे काम करत असताना पाहिल्यानंतर सर्वांनाच कौतुक वाटतं; पण सुजित शिंदे यांना याविषयी काहीही नवीन वाटत नाही. नियमित कामाप्रमाणेच ते सफाईदारपणे करत असतात. यामध्ये कोणतीही चूक राहणार नाही, याची काळजी घेतात. सुजित शिंदे यांची कहाणी मोठी व रोमांचकारी आहे. ते दोन-अडीच वर्षांचे असताना औषधाचा दुष्परिणाम होऊन त्यांच्या एका डोळ्याची दृष्टी गेली. दुसऱ्या डोळ्याने त्यांना दिसत होते. सहावीत असताना त्यांचा दुसरा डोळाही निकामी झाला. अन् ते पूर्ण दृष्टिहीन झाले. हा आघात ते आणि कुटुंबांना हादरवून टाकणारा होता.
हा धक्क्यातून सावण्यास त्यांना दोन महिने लागले. या काळात ते शाळेलाही गेले नाही; पण आई-वडिलांनी आधार दिल्याने ते पुन्हा शाळेत जाऊ लागले. याच काळात त्यांना हेमा सोनी यांच्या ‘सत्यशोध अंध सहयोग उपक्रम’ या संस्थेने मोठी मदत केली. संस्थेचे एक शिक्षक येऊन ब्रेल लिपीतून प्रशिक्षण देत होते. बारावी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यावर आईने सुजित हे स्वावलंबी बनावेत म्हणून त्यांना पुण्यात शासकीय वसतिगृहात ठेवले. वाडिया कॉलेजमधून पदवी संपादन केली.


सुजित शिंदे यांची खेड येथील अश्विनी यांच्याशी ओळख झाली. त्यातून एकमेकांचे विचार जुळत गेले. यातून त्यांनी प्रेमविवाह करण्याचा निर्णय घेतला. सुजित शिंदे यांच्यावर शाहू-फुले-आंबेडकर विचारांचा पगडा आहे. त्यातून सत्यशोध संस्थेच्या सानिध्यात आले होते. त्यामुळे वायफळ खर्च न करता त्यांनी १४ फेबु्रवारीला सत्यशोध पद्धतीने विवाह केला. अश्विनी या सध्या खासगी क्षेत्रात नोकरी करत आहेत.

Web Title: Sujhit Shinde Rallylit Announcer of Limbo