उस्मानाबादी अन् सानेन शेळी दुधासाठी उपयुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:29 IST2021-06-04T04:29:54+5:302021-06-04T04:29:54+5:30
सातारा : ‘शेळी व मेंढ्या शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसाय म्हणून उपयुक्त आहेत. उस्मानाबादी व सानेन या जातीच्या शेळ्याही दुधासाठी उपयुक्त ...

उस्मानाबादी अन् सानेन शेळी दुधासाठी उपयुक्त
सातारा : ‘शेळी व मेंढ्या शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसाय म्हणून उपयुक्त आहेत. उस्मानाबादी व सानेन या जातीच्या शेळ्याही दुधासाठी उपयुक्त असून संगोपनासाठी शेतकऱ्यांना वाटप करण्याचा मानस आहे,’ अशी माहिती पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकासमंत्री सुनील केदार यांनी दिली.
दहिवडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्रास पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री केदार यांनी भेट दिली. या वेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती मंगेश धुमाळ, माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, रणजितसिंह देशमुख, पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. शशांक कांबळे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अंकुश परिहार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस प्रा. विश्वंभर बाबर, एम. के. भोसले, अशोक गोडसे, दादासाहेब काळे, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अरिफ इनामदार, डॉ. बी. एन. मदने, डॉ. चंद्रकांत खाडे, डॉ. पांडुरंग येडगे आदी उपस्थित होते.
मंत्री सुनील केदार म्हणाले, ‘पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे भरण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे कामावर होणारा विपरीत परिणाम यापुढे होणार नाही. उस्मानाबादी व सानेन जातीच्या शेळीचे संवर्धन व विकास करण्यावर भर देण्यात येणार असून, संगोपनासाठी शेतकऱ्यांना वाटपही करण्यात येणार आहे.
फोटो दि.०३दहिवडी सुनील केदार फोटो...
फोटो ओळ : दहिवडी, ता. माण येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्रास पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी भेट दिली. यावेळी रणजितसिंह देशमुख, मंगेश धुमाळ आदी उपस्थित होते.
....................................................