गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:34 IST2021-02-08T04:34:45+5:302021-02-08T04:34:45+5:30
कऱ्हाड : आगाशिवनगर येथे युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी दुपारी ही घटना उघडकीस आली. याबाबतची खबर ...

गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या
कऱ्हाड : आगाशिवनगर येथे युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी दुपारी ही घटना उघडकीस आली. याबाबतची खबर संदीप जगन्नाथ चव्हाण (रा. नांदलापूर) यांनी शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.
गणेश कृष्णत निकम (वय २७, रा. माथणे किराणा स्टोअर्समागे, आगाशिवनगर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आगाशिवनगर येथे संदीप चव्हाण यांचे मामा कृष्णत मारूती निकम हे त्यांची पत्नी सुरेखा व मुलगा गणेश निकम यांच्यासह राहतात. संदीप चव्हाण हे त्यांच्या विहापूर येथे शेतात कामासाठी गेले होते. रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास चव्हाण यांना त्यांच्या मामाने फोनवरून मुलगा गणेश याने राहत्या घरात दोरीचे सहाय्याने गळफास घेतला असल्याचे सांगितले. त्यानंतर संदीप चव्हाण यांनी त्याठिकाणी जावून पाहिले असता, त्यांचा मामेभाऊ गणेश कृष्णत निकम याने राहत्या घरात किचनमध्ये फॅनच्या हुकाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसले. त्यानंतर त्यांनी याबाबतची खबर कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात दिली.