दहावीतील मुलाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:28 IST2021-05-31T04:28:29+5:302021-05-31T04:28:29+5:30

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, भांगर येथे एकजण मोलमजुरी करून कुटुंब चालवितात. शनिवारी ते मोलमजुरीसाठी तळदेव येथे गेले. तर ...

Suicide of a tenth grader | दहावीतील मुलाची आत्महत्या

दहावीतील मुलाची आत्महत्या

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, भांगर येथे एकजण मोलमजुरी करून कुटुंब चालवितात. शनिवारी ते मोलमजुरीसाठी तळदेव येथे गेले. तर त्यांचा एक मुलगा जळण आणण्यासाठी गेला. त्यामुळे शनिवारी संबंधित मजुराची पत्नी, मोठी मुलगी व दहावीत शिकत असलेला मुलगा हे तिघेच घरी होते. सकाळपासून दहावीतील मुलगा घरी न आल्याने आईने सांगितल्यामुळे मोठ्या मुलाने लहान भावाचा शोध सुरू केला. तेव्हा साडेचार वाजता पाण्याची टाकी या शिवारात एका उंबराच्या झाडाला दोरीच्या मदतीने गळफास घेतलेल्या अवस्थेत तो आढळून आला. यामुळे भयभीत झालेल्या मुलाने ही घटना आईला दिली. त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. आत्महत्या केलेल्या मुलाच्या भावाने महाबळेश्वर पोलिसांना खबरी जबाब दिली. यावरून पोलिसांनी या घटनेची नोंद केली आहे.

Web Title: Suicide of a tenth grader