आंतरराष्ट्रीय कराटेपटूची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2015 23:39 IST2015-05-15T22:03:51+5:302015-05-15T23:39:42+5:30
कराटे स्पर्धांमध्ये सहभागी होत पदक पटकावणाऱ्या

आंतरराष्ट्रीय कराटेपटूची गळफास घेऊन आत्महत्या
कार्वे : मलेशिया, नेपाळ, श्रीलंका यासह अन्य देशांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कराटे स्पर्धांमध्ये सहभागी होत पदक पटकावणाऱ्या कार्वे, ता. कऱ्हाड येथील खेळाडूने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. अक्षय संभाजी हुलवान (वय २२, रा. कार्वे) असे त्याचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, अक्षय हा गुरुवारी रात्री एका मित्राच्या वाढदिवसासाठी घरातून निघून गेला. रात्री उशिरा तो घरी परतला. घरात आल्यानंतर तो त्याच्या खोलीत झोपण्यासाठी गेला. अक्षयचे वडील शुक्रवारी सकाळी कामावरून घरी परत आले, तेव्हा अक्षयच्या खोलीचा दरवाजा बंद होता. अक्षयला हाका मारूनसुद्धा तो दरवाजा उघडत नसल्याचे त्यांनी अखेर खोलीचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी अक्षयने स्लॅबच्या हुकाला गळफास घेतल्याचे आढळले. आत्महत्येचे कारण रात्री उशिरापर्यंत स्पष्ट झाले नव्हते. (प्रतिनिधी)