विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:40 IST2021-01-23T04:40:43+5:302021-01-23T04:40:43+5:30
वडूज : डांभेवाडी, ता. खटाव येथील सारिका विशाल बागल (वय २९) या विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन ...

विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
वडूज : डांभेवाडी, ता. खटाव येथील सारिका विशाल बागल (वय २९) या विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याची वडूज पोलीस ठाण्यात नोंद केली आहे. दरम्यान, नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने तणाव निर्माण झाला होता.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सारिका विशाल बागल या विवाहित महिलेने शुक्रवार, २२ जानेवारी रोजी सकाळी अकराच्या सुमारास राहत्या घरातील लोखंडी अँगलला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत लाला गोविंद शिंदे (रा. भालवाडी, ता. माण) यांनी वडूज पोलीस ठाण्यात या घटनेची फिर्याद दिली. घटनेची माहिती मिळताच वडूजचे पोलीस हवालदार धनाजी वायदंडे, पोलीस कॉन्स्टेबल मेघा जगताप हजर झाले. मात्र उशिरापर्यंत नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. वडूज पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख व कर्मचारी घटनास्थळी गेले. त्यानंतर रात्री उशिरा शवविच्छेदनासाठी मृतदेह वडूज ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला. रात्री उशिरापर्यंत शवविच्छेदन अहवाल प्राप्त न झाल्याने आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. या घटनेची वडूज पोलीस ठाण्यात नोंद झाली असून पोलीस हवालदार सविता वाघमारे तपास करीत आहेत.