काशीळ येथे एकाची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:39 IST2021-08-15T04:39:59+5:302021-08-15T04:39:59+5:30
नागठाणे : काशीळ येथे एका व्यक्तीने गळफास लावून आत्महत्या केली आहे. निवास सखाराम जगताप (वय ४०, वडीरायबाग ता. ...

काशीळ येथे एकाची गळफास घेऊन आत्महत्या
नागठाणे : काशीळ येथे एका व्यक्तीने गळफास लावून आत्महत्या केली आहे. निवास सखाराम जगताप (वय ४०, वडीरायबाग ता. कडेगाव, जि. सांगली) असे गळफास घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मौजे काशीळ (ता. सातारा) येथील पुणे-बेंगलोर हायवेशेजारी सेवारस्त्याचे बाजूला अतुल तानाजी जाधव यांचे गट नं २५५ मधील शेतात सोयाबीन नावाचे पीक आहे. गुरुवारी रात्री ९.३० वा. सुमारास अतुल जाधव हे सोयाबीन पिकास पाणी देण्यासाठी गेले असता त्यांचे शेतातील एका जंगली झाडाजवळ एका व्यक्तीने स्वतःची दुचाकी (एमएच १० बीबी ०९१५) उभी करून झाडास गळफास लावून घेतल्याचे निदर्शनास आले. त्या शेजारीस एक मोबाइलसुद्धा पडलेला होता. घटनेची नोंद बोरगाव पोलीस ठाण्यात झाली असून, अधिक तपास डॉ. सागर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नितीन महाडिक करत आहेत.