मानसिक तणावातून जवानाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:43 IST2021-09-25T04:43:00+5:302021-09-25T04:43:00+5:30

वाई : कुसगाव, ता. वाई येथील एका जवानाने मानसिक तणावाखाली आत्महत्या केल्याची घटना घडली. अभिजित कृष्णदेव वरे (वय ३२ ...

Suicide of a soldier due to mental stress | मानसिक तणावातून जवानाची आत्महत्या

मानसिक तणावातून जवानाची आत्महत्या

वाई : कुसगाव, ता. वाई येथील एका जवानाने मानसिक तणावाखाली आत्महत्या केल्याची घटना घडली. अभिजित कृष्णदेव वरे (वय ३२ ) असे आत्महत्या केलेल्या जवानांचे नाव आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई व भाऊ असा परिवार आहे.

याबाबत माहिती अशी की, अभिजित वरे हे भारतीय सैन्यात रायपूर येथे नोकरीला होते. त्यांची बदली आसाम येथे झाली होती. तीन महिन्यांपासून तो कुसगाव येथे सुटीवर आला होता. ते सतत मानसिक तणावाखाली असायचे. त्यांच्यावर सातारा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान त्यांनी गुरुवार (ता. २३) रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घरातील सर्व झोपले असताना घरातील तुळईस गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले. त्यांचे चुलते संजय रामचंद्र वरे यांनी याबाबतची वाई पोलीस ठाण्यात माहिती दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून महिला पोलीस हवालदार क्षमा माने तपास करीत आहेत.

२४अभिजित वरे

Web Title: Suicide of a soldier due to mental stress