प्राध्यापकाची रस्त्याजवळ आत्महत्या

By Admin | Updated: July 30, 2014 23:17 IST2014-07-30T23:15:41+5:302014-07-30T23:17:42+5:30

झाडाला गळफास : कौटुंबिक वादातून घटना घडल्याचा संशय

Suicide on the professor's road | प्राध्यापकाची रस्त्याजवळ आत्महत्या

प्राध्यापकाची रस्त्याजवळ आत्महत्या

सातारा : माढा तालुक्यातील कुर्डुवाडी येथे प्राध्यापक म्हणून काम करत असलेले गजानन नानासाहेब काटकर (वय ४० मूळ रा. कुकुडवाड, ता. माण सध्या रा. शाहूनगर, सातारा) यांनी आज (बुधवारी) सकाळी येथील जिल्हा परिषदेसमोरील एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. भर रस्त्याच्याकडेला प्रा. काटकर यांनी आत्महत्या केल्याने शहरात खळबळ उडाली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सातारा हॉस्पिटलच्या आवारामधील झाडाला एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सकाळी काही नागरिकांच्या निदर्शनास आले. भर रस्त्याच्याकडेला आत्महत्या केल्याने बघ्यांची प्रचंड गर्दी झाली. डॉ. विकास जाधव यांनी शहर पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी तत्काळ पोहोचले. झाडाखाली प्लास्टिकची पिशवी होती. त्या पिशवीत चिठ्ठी सापडली. त्या चिठ्ठीवरून गजानन काटकर यांची ओळख पटली. पोलिसांनी त्यांच्या भावाला बोलावून घेतले. काटकर हे माढा तालुक्यामधील एका कॉलेजवर प्राध्यापक म्हणून काम करत होते. त्यांची पत्नी उंब्रज येथील शाळेवर शिक्षिका आहे.
साताऱ्यात त्यांनी घर घेतले आहे. सुटीच्या दिवशी ते साताऱ्यात येत होते. ‘मला तुझ्याशी बोलायचे आहे, तू साताऱ्यात ये,’ असे काटकर यांनी त्यांच्या भावाला मंगळवारी फोन करून सांगितले होते. बुधवारी सकाळी ते साताऱ्याला यायला निघाले. मात्र वाटेतच त्यांना भावाने आत्महत्या केल्याचे समजले.
काटकर यांनी आत्महत्या केल्याचे समजताच त्यांच्या पत्नीला जबर मानसिक धक्का बसला. त्यांना नातेवाइकांनी तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. या प्रकाराची शहर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. (प्रतिनिधी)
चिठ्ठी उलगडणार रहस्य !
गजानन काटकर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहिली आहे. कौटुंबिक वादातून त्यांनी आत्महत्या केली असावी, अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली. चिठ्ठीत दोन व्यक्तींच्या नावाचा उल्लेख केला असून, चिठ्ठी काटकर यांनीच लिहिली आहे का? याची शहानिशा झाल्यानंतर संबंधितावर गुन्हा दाखल केला जाईल, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

Web Title: Suicide on the professor's road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.