वडजल येथे एकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:43 IST2021-09-06T04:43:56+5:302021-09-06T04:43:56+5:30

म्हसवड : वडजल (ता.माण) येथील शेतकरी लक्ष्मीकांत उर्फ शरद रामचंद्र काटकर (वय ३८) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ...

Suicide of one at Vadjal | वडजल येथे एकाची आत्महत्या

वडजल येथे एकाची आत्महत्या

म्हसवड : वडजल (ता.माण) येथील शेतकरी लक्ष्मीकांत उर्फ शरद रामचंद्र काटकर (वय ३८) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, वडजल (ता. माण) येथील शेतकरी रामचंद्र जयवंत काटकर यांचे हृदयविकाराने निधन झाले होते. यामुळे काटकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. या घटनेमुळे त्यांचा मोठा मुलगा लक्ष्मीकांत उर्फ शरद काटकर यांना मानसिक धक्का बसला होता. वडील रामचंद्र जयवंत काटकर यांचे निधन होऊन महिना झाला नसताना, लक्ष्मीकांत याने स्वत:च्या शेतात लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली. याबाबतची तक्रार महेश काटकर यांनी दिल्याने, म्हसवड पोलीस घटनास्थळी येऊन पंचनामा करून तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ.लक्ष्मण कोडलकर यांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करण्यात आले.

फोटो आहे..आयकार्ड

०५लक्ष्मीकांत काटकर

050921\img-20210905-wa0031.jpg

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतात गळफास घेऊन आत्महत्या

Web Title: Suicide of one at Vadjal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.