खेड येथील शेतकऱ्याची पेटवून घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 15:48 IST2017-08-30T15:39:35+5:302017-08-30T15:48:04+5:30
सातारा: खेड ता. सातारा येथील दिपक वसंत कदम (वय ३८) या शेतकऱ्याने मंगळवारी सकाळी कर्जबाजारीपणाला कंटाळून पेटवून घेऊन आत्महत्या केली.

खेड येथील शेतकऱ्याची पेटवून घेऊन आत्महत्या
सातारा: खेड ता. सातारा येथील दिपक वसंत कदम (वय ३८) या शेतकऱ्याने मंगळवारी सकाळी कर्जबाजारीपणाला कंटाळून पेटवून घेऊन आत्महत्या केली.
गंभीर जखमी अवस्थेत त्यांना उपचारसाठी सिविल हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता उपचार सुरु असताना मृत्यू झाला.
सातारा शहरातील बँका, पतसंस्था मधून त्यांनी सुमारे १२ लाख रुपये कर्ज घेतले होते. कर्जफेडीसाठी वारंवार बँका तसेच पतसंस्थांनी त्यांच्या मागे तगादा लावला होता.