दरम्यान, कऱ्हाड पालिकेच्या अग्निशामक दलाची गाडी वेळेत आल्याने आग आटोक्यात आली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, ट्रॅक्टर (क्र. एमएच २३ टी ४९९५) हा पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून भरलेल्या उसासह चालक हरिचंद्र काशीद (रा. बीड) हा जयवंत शुगर कारखान्याकडे घेऊन निघाला होता. हा ट्रॅक्टर सहा वाजण्याच्या सुमारास बेलवडे हवेली गावच्या हद्दीत आला असता, या ट्रॅक्टरने अचानक पेट घेतल्याने, तसेच पाहता पाहता या आगीने रौद्ररूप धारण केल्याने आगीत ट्रॅक्टरचे उसासह लाखो रुपयांचे नुकसान झाले.
कऱ्हाड पालिकेच्या अग्निशामक दलाची गाडी वेळेत आल्याने आग आटोक्यात आली. मात्र या आगीत ट्रॅक्टर जळून खाक झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेने महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत बनली होती.
फोटो : ०५केआरडी०३
कॅप्शन :
पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर बेलवडे हवेली, ता. कऱ्हाड येथे अचानक लागलेल्या आगीत ट्रॅक्टर जळून खाक झाला.