शहरं
Join us  
Trending Stories
1
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
2
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
3
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
4
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
5
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
6
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
7
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
8
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
9
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
10
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
11
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
12
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
13
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
14
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
15
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
16
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
17
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
18
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
19
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
20
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     

कुसळाच्या माळावर ऊस, कांदा, भाजी..! श्रमदानामुळे कोटीचे उत्पन्न वाढणार : बनगरवाडीत २५० हेक्टरने बागायत क्षेत्र वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 00:15 IST

बऱ्यापैकी पाऊस होऊनही पिकातून हाती फारसे काय यायचे नाही. त्याच बनगरवाडीत सध्या वॉटर कपच्या कामामुळे कुसळ उगवणारे २५० हेक्टर क्षेत्र बागायत झाले आहे.

नितीन काळेल ।सातारा : बऱ्यापैकी पाऊस होऊनही पिकातून हाती फारसे काय यायचे नाही. त्याच बनगरवाडीत सध्या वॉटर कपच्या कामामुळे कुसळ उगवणारे २५० हेक्टर क्षेत्र बागायत झाले आहे. तर अवघ्या एका पावसात पाणी उपलब्ध झाल्याने सध्या १०० एकरांवर कांदा, ३५० एकरवर ऊस आणि २० एकरवर भाजी पिकत आहे. त्यामुळे या खरीप हंगामात गावाचे उत्पन्न किमान एक कोटी रुपयाने वाढणार आहे.

माण तालुक्यातील बनगरवाडी (वरकुटे मलवडी) गाव इतर दुष्काळी गावाप्रमाणेच. येथील बहुतांश लोकांचा व्यवसाय मेंढपाळाचा. तरुण मुले मुंबई, पुणे येथे नोकरीसाठी. टोकाचे राजकारण खेळणाºया या गावात वॉटर कपच्या माध्यमातून मनसंधारण झाले आणि गाव बदलले. गावाचे एकूण भौगोलिक क्षेत्र १३५० हेक्टर असले तरी अर्धी जमीन ही माळरानाची होती. त्यामुळे शेती पिकवायची झाली तर जेमतेमच उत्पन्न हाती यायचे. त्यातच आयकर विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. नितीन वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली गावाने बदलायचं ठरवलं. त्यासाठी वॉटर कप स्पर्धेत या गावाने प्रथमच सहभाग घेतला. मुंबई, पुणे येथील तरुण, नोकरदार व इतर राज्यात कामासाठी गेलेल्यांनी पुढाकार घेत लोकवर्गणीही गोळा केली. वॉटर कप स्पर्धेच्या ४५ दिवसांच्या कामात गावाने माळराने फोडून पाणीसाठा वाढविण्यासाठी प्रयत्न केला.

स्पर्धेच्या काळात एकूण ३ लाख ३० हजार घनमीटर इतके काम केले. त्यामध्ये डीपसीसीटीचे २५ हजार घनमीटर, सीसीटी ७२०० घनमीटर, ४०० हेक्टरवर कंपार्टमेंट बंडींग केले. तसेच ३० शेततळी निर्माण करण्यात आली. १० मातीनाला बांध, दोन जुन्या पाझर तलावांची दुरुस्ती, १८० दगडी बांध, साडेतीन किलोमीटर लांबीच्या ओढ्याचे खोली व रुंदीकरण करण्यात आले. त्याचे दृश्य परिणाम सध्या दिसू लागले आहेत.

बनगरवाडी व परिसरात जून महिन्यात एकच मोठा पाऊस झाला आहे. त्यानंतर पावसाने दडी मारली ती आजही कायम आहे. पण, वॉटर कप स्पर्धेतील कामामुळे विहिरी पूर्ण भरल्या आहेत. सर्वत्र पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे कधी नव्हे ते लोकांनी खरीप हंगामात या पाण्याच्या भरवशावरच नवीन २५० हेक्टर क्षेत्र बागायत करण्याचा निर्णय घेतला. खरिपात बाजरीशिवाय कधीही इतर पीक न घेणाºया शेतकºयांनी जून, जुलैमध्येच ऊस, कांद्याचे पीक लावले. तर अनेकांनी भाजीपाला केला आहे. सध्या नव्याने १०० एकरांवर कांदा, ३५० एकरवरील ऊस डोलू लागला आहे. तर बाजरी ७५० एकरवर घेण्यात आली आहे.येथील भाजीपाला आता तालुक्यातील आठवडी बाजारात जात आहे. त्यामुळे शेतकºयांना रोजच्या रोज पैसा मिळू लागला आहे. तसेच अनेकांना रोजगारही उपलब्ध झाला आहे. येत्या काळात फळबागा वाढविण्यासाठी शेतकºयांनी नियोजन केले आहे.

३० गुंठ्यातील ढोबळीमधून ५ लाख...बनगरवाडीत पाण्याने किमया केली आहे. त्यामुळे माळरानावर पिके उगवली आहेत. येथील शेतकरी आबासो बनगर यांनी अवघ्या ३० गुंठे क्षेत्रावर ढोबळी मिरचीचे पीक घेतले आहे. या ढोबळी पिकाला चांगला दरही मिळाला. यामधून आतापर्यंत बनगर यांना ५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. सध्याही त्यांच्या रानात ढोबळीचे पीक असून, त्यातून आणखी किमान दोन लाखांचे उत्पन्न मिळेल, असा अंदाज आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरी