‘वर्धन अ‍ॅग्रो’ची ऊस बिलात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:38 IST2021-03-20T04:38:09+5:302021-03-20T04:38:09+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क औंध : घाटमाथा (ता. खटाव) येथील वर्धन अ‍ॅग्रो प्रोसेसिंग कारखान्याने चालू गळीत हंगाम २०२०-२१ मधील फेब्रुवारी ...

In the sugarcane bill of 'Vardhan Agro' | ‘वर्धन अ‍ॅग्रो’ची ऊस बिलात

‘वर्धन अ‍ॅग्रो’ची ऊस बिलात

लोकमत न्यूज नेटवर्क

औंध : घाटमाथा (ता. खटाव) येथील वर्धन अ‍ॅग्रो प्रोसेसिंग कारखान्याने चालू गळीत हंगाम २०२०-२१ मधील फेब्रुवारी महिनाअखेर २४०० रुपयांप्रमाणे पहिली उचल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे. कारखान्याने पहिल्यापासून जिल्ह्यात ऊस बिलात आघाडी घेतल्याचे चित्र आहे. व्यवस्थापनाने सुरुवातीपासूनच आर्थिक नियोजन योग्य पद्धतीने केल्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी वाहतूकदार यांची बिले वेळेत व नियमित देणे शक्य झाल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन धैर्यशील कदम यांनी पत्रकारांना दिली.

धैर्यशील कदम म्हणाले, ‘गतवर्षी कोरोनामुळे कारखाना वेळेअगोदर एक महिना बंद करावा लागला होता. याचा आर्थिक ताण कारखान्यावर आला होता. परंतु चालू गळीत हंगामात सुयोग्य नियोजनाद्वारे कारखाना लवकर सुरू करून वेळेत शेतकऱ्यांच्या खात्यांवर बिले वर्ग करता आली आहेत. मार्च महिन्यात शेतकऱ्यांची बँकेच्या तगाद्यातून सुटका व्हावी आणि शेतकऱ्यांची आर्थिक चिंता दूर व्हावी, यासाठी कारखान्याने सूक्ष्म नियोजन केले आहे. नेहमीच प्रयत्नशील आहे. मार्चअखेर पर्यंतची बिले सुद्धा लवकरच खात्यावर जमा करण्यासाठी व्यवस्थापन काम करत आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत इतर कारखान्यांच्याबरोबरीने दर देण्यात वर्धन मागे राहणार नसल्याचे कदम यांनी सांगितले.

पुढील हंगामात अद्ययावत ६० केएलपीडीचा डिस्टिलरी प्रकल्प उभारणी करण्याकरिता कायदेशीर बाबींना मान्यता मिळाली आहे. यामुळे शेकडो लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. ऊस शिल्लक राहिला असेल तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कारखान्याच्या गट ऑफिसशी संपर्क साधावा, असे आवाहन कार्यकारी संचालक विक्रमशील कदम यांनी केले आहे. (वा.प्र.)

आयकार्ड फोटो.

19धैर्यशील कदम

Web Title: In the sugarcane bill of 'Vardhan Agro'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.