सोसायटी निवडणुकीत साखर पेरणी

By Admin | Updated: January 21, 2015 23:51 IST2015-01-21T21:04:17+5:302015-01-21T23:51:11+5:30

ग्रामपंचायतीची रंगीत तालीम : फलटण पश्चिम तालुक्यातील चित्र

Sugar Seedling in Society Elections | सोसायटी निवडणुकीत साखर पेरणी

सोसायटी निवडणुकीत साखर पेरणी

आदर्की : फलटण पश्चिम भागातील सोसायटी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होत असतानाच सहा महिन्यांवर ग्रामपंचायत मुदत संपत असल्याने गावागावांत सोसायटीच्या निवडणुकीत ग्रामपंचायत निवडणुकीची साखर पेरणी होत आहे.फलटण पश्चिम भागात राष्ट्रवादी-राष्ट्रीय काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या सहकारी सोसायट्या व ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. यावेळी भाजप-शिवसेना, मित्र पक्षाची सत्ता राज्यात व केंद्रात असल्याने विधानसभा निवडणुकीत आयाराम-गयारामाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे सोसायटी निवडणूक जाहीर होताच आयाराम-गयाराम जागे झाले आहेत.फलटण पश्चिम भागात हिंगणगाव, सासवड, कापशी सोसायटीच्या निवडणुका चुरशीने होतात. त्यामुळे सभासद शेतकरी वर्गाचा बाकी आदर्की खुर्द, आदर्की बुद्रुक, आळजापूर, बिबी सोसायटीच्या निवडणुका बिनविरोध होतात; परंतु धोम-बलकवडीचे पाणी आल्याने उसाबरोबर नगदी पिकासाठी पीक कर्जाची गरज वाढणार आहे. त्यामुळे या गावचेही सभासद जागे झाले आहेत. सोसायटी निवडणुका होताच हिंगणगाव, बिबी, वाघोशी, कोऱ्हाळे, कापशी, आळजापूर आदी ग्रामपंचायतीचा पाच वर्षांचा कालावधी आगामी महिन्यात संपणार असल्याने अनेक सोसायटीत सत्ता असणाऱ्या नेत्यांनी निवडणुका बिनविरोध व्हाव्यात म्हणून आगामी ग्रामपंचायतीचे गाजर संबंधितांना दाखवत असल्याचे चित्र फलटण तालुक्यात दिसत आहे. (वार्ताहर)

लक्ष्य ग्रामपंचायत!
राज्यात सत्ता बदल झाल्याने राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी विरुद्ध महायुती काही कार्यकर्ते गावाअंतर्गत गटबाजीचा फायदा घेणार असल्याची चर्चा आहे. सोसायटी निवडणुकीत ग्रामपंचायतीची साखर पेरणी होत आहे.

Web Title: Sugar Seedling in Society Elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.