चौदा गावांची वीज अचानक खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:40 IST2021-04-01T04:40:03+5:302021-04-01T04:40:03+5:30
सदाशिवगड परिसरातील गावांमध्ये रविवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास अचानक वीज गायब झाली. त्यामुळे ग्रामस्थ हैराण झाले. एकाच वेळी अनेक ...

चौदा गावांची वीज अचानक खंडित
सदाशिवगड परिसरातील गावांमध्ये रविवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास अचानक वीज गायब झाली. त्यामुळे ग्रामस्थ हैराण झाले. एकाच वेळी अनेक गावांतील वीज खंडित झाल्यामुळे कर्मचारीही संभ्रमात होते. बिघाड शोधण्यासाठी कर्मचाऱ्यांनी प्रयत्न सुरू केले. मात्र, त्यामध्ये त्यांना लवकर यश आले नाही. सुमारे तीन तास ठिकठिकाणी बिघाड शोधण्याचे काम सुरू होते. अखेर बिघाड निदर्शनास आल्यानंतर वीज कर्मचाऱ्यांनी तत्काळ दुरुस्ती केली. रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास चौदा गावांतील पुरवठा पूर्ववत सुरू झाला. हजारमाची, ओगलेवाडी, राजमाची, वनवासमाची, बाबरमाची, विरवडे, करवडी, वाघेरी, मेरवेवाडी, पाचुंद, निळेश्वर वडोली, उत्तर पार्ले, सुर्ली व कामथी या गावातील वीजपुरवठा खंडित झाला होता. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने उकाड्याने सर्वांना हैराण केले आहे. त्यातच रात्रीच्या वेळी वीज गायब झाल्यामुळे ग्रामस्थ चिंतेत होते. रात्री झालेला बिघाड दुरुस्त होणार की नाही, याबाबत साशंकता असताना वीज कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवत रात्री उशिरापर्यंत काम करून वीजपुरवठा सुरळीत केला.