वडजलमध्ये अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची भंबेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:33 IST2021-01-09T04:33:22+5:302021-01-09T04:33:22+5:30
वडजल परिसरात शुक्रवारी अचानक आलेल्या पावसाने वातावरणात आणखीनच गारठा वाढला होता. परिसरातील शेतात गहू पीक चांगले आले असल्याने या ...

वडजलमध्ये अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची भंबेरी
वडजल परिसरात शुक्रवारी अचानक आलेल्या पावसाने वातावरणात आणखीनच गारठा वाढला होता. परिसरातील शेतात गहू पीक चांगले आले असल्याने या पिकासाठी हा पाऊस मानवणारा नसल्याने पिकांवर अनेक रोग पडण्याची शक्यता आहे. नागरिकांच्या आरोग्यालाही तो अपायकारक आहे. ऐन थंडीच्या मोसमात पडणारा हा पाऊस लहान मुले व वयोवृद्धांसाठी आरोग्यवर्धक नाही.
वडजलमध्ये अचानक आलेल्या पावसाने अनेक नागरिक पावसात भिजले, तर अनेकांनी पावसात भिजण्यापासून वाचण्यासाठी मिळेल त्या ठिकाणाचा आसरा घेतला. शेतातील पिकांनाही या पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. अचानक गारठा वाढल्याने नागरिकांनी घरातच थांबणे पसंत केले.
०८मलटण-रेन
फलटण तालुक्यातील वडजल परिसरात शुक्रवारी अचानक पाऊस झाला. त्यामुळे अडोशासाठी ग्रामस्थांची चांगलीच धावाधाव झाली. त्यातील काहींनी अशाप्रकारे कपाटाचा वापर केला. (फोटो : प्रशांत रणवरे)