जीपॅट परीक्षेत यशोदा फार्मसीच्या विद्यार्थ्यांचे यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:38 IST2021-03-25T04:38:12+5:302021-03-25T04:38:12+5:30
सातारा राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येणाऱ्या ग्रॅज्युएट फार्मसी ॲप्टिट्यूड टेस्ट या परीक्षेत यशोदा फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. ...

जीपॅट परीक्षेत यशोदा फार्मसीच्या विद्यार्थ्यांचे यश
सातारा
राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येणाऱ्या ग्रॅज्युएट फार्मसी ॲप्टिट्यूड टेस्ट या परीक्षेत यशोदा फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. उच्च शिक्षणासाठी अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या जीपॅट परीक्षेत महाविद्यालयाचा उत्कर्ष पाटील हा राष्ट्रीय स्तरावर २८८ वा क्रमांक मिळवून महाविद्यालयात प्रथम आला. त्याबरोबरच प्रज्ञा राऊत (४४९), नमिरा सय्यद (५०५), श्रद्धा फाळके(१४०४), शुभम धोंडवड (१६०८), रेश्मा शेलार ( २५५३) यांनीही यश मिळविले आहे.
महाविद्यालयाच्या सुरूवातीपासूनच या परीक्षेमध्ये यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. या वर्षीही ही परंपरा कायम राखत सहा विद्यार्थ्यांनी यश संपादित केले आहे. संपादित केलेले यश खरच वाखाणण्याजोगे आहे. यासाठी महाविद्यालयाने केलेले प्रयत्नही तितकेच मोलाचे आहेत. जसे विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन वर्ग घेणे, विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी विविध मान्यवरांचे मार्गदर्शन देणे व ऑनलाईन सराव परीक्षा घेणे या सर्वांचे फलित म्हणून यशाची ही परंपरा कायम राखत महाविद्यालाच्या दृष्टीने घोडदौड चालू आहे.
या यशासाठी व विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. दशरथ सगरे, उपाध्यक्ष प्रा. अजिंक्य सगरे, अतुल माळी यांनी शुभेच्छा दिल्या. या परीक्षेच्या तयारीसाठी जीपॅट समन्वयक प्रा. सचिन रोहणे यांनी विद्यार्थ्यांकडून अत्यंत नियोजनपूर्वक तयारी करून घेतली होती. तसेच बी फार्मसीचे समन्वयक प्रा. अविनाश भागवत व इतर शिक्षकांनी संबंधित विषयाबाबत मार्गदर्शन केले. यावेळी प्राचार्य डॉ. विवेककुमार के. रेदासनी यांनी या घवघवीत यशाबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले व भविष्यात सुद्धा या यशामध्ये अशीच वाढ होऊन संस्था उत्तरोत्तर प्रगती करेल असा विश्वास व्यक्त केला. ( वा. प्र. )