राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:41 IST2021-04-02T04:41:15+5:302021-04-02T04:41:15+5:30

या स्पर्धेत पुणे, मुंबई, ठाणे, वाळवा, कुपवाड, विटा, सोलापूर, रत्नागिरी, भडकंबे, शिवनगर आदी प्रमुख संघांबरोबर अन्य सुमारे २५ संघ ...

Success in state level kho-kho competition | राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत यश

राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत यश

या स्पर्धेत पुणे, मुंबई, ठाणे, वाळवा, कुपवाड, विटा, सोलापूर, रत्नागिरी, भडकंबे, शिवनगर आदी प्रमुख संघांबरोबर अन्य सुमारे २५ संघ सहभागी झाले होते.

विजयी संघास संदीप तावडे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी सातारा जिल्हा खो-खो अमॅच्युअर असोसिएशनचे सरचिटणीस महेंद्र गाढवे यांची प्रमुख उपस्थिती होती.

संघनायक श्रेयस चव्हाण, पार्थ कळसकर, विजय चव्हाण, आदित्य साळुंखे, प्रवीण यादव, गणेश साळुंखे, रितेश जाधव, रेवननाथ यादव, सागर मसुगडे, संकेत गुरव, पीयूष चव्हाण, आर्यन माने, वेदांत साळुंखे व सार्थक केंजळे या खेळाडूंनी नेत्रदीपक खेळाचे प्रदर्शन घडवत चॅम्पियनशिपवर आपले नाव कोरले.

खेळाडूंना कोच लखन साळुंखे, शशिकांत चव्हाण, ऋषिकेश यादव, दत्तात्रय कमाने, स्वप्निल साळुंखे, संजय साळुंखे, प्रसाद साळुंखे यांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: Success in state level kho-kho competition