अलमास मुलाणी यांनी रनिंगमध्ये मिळवलेले यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:09 IST2021-02-05T09:09:04+5:302021-02-05T09:09:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : प्रतिकूल कौटुंबिक परिस्थितीवर मात करून अलमास मुलाणी यांनी रनिंग, सायकलिंग, ट्रेकिंग स्पर्धांमध्ये मिळविलेले यश ...

अलमास मुलाणी यांनी रनिंगमध्ये मिळवलेले यश
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : प्रतिकूल कौटुंबिक परिस्थितीवर मात करून अलमास मुलाणी यांनी रनिंग, सायकलिंग, ट्रेकिंग स्पर्धांमध्ये मिळविलेले यश जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांसाठी प्रेरणादायक असून कौतुकास्पद असल्याचे मत कोरेगाव तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे नेते दादासाहेब सरकाळे यांनी व्यक्त केले.
कोरेगाव तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे नेते दादासाहेब सरकाळे, ज्येष्ठ मार्गदर्शिका शाबिरा मुल्ला यांनी ७२ कि.मी. सायकलिंग रात्रीच्या वेळी यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल अलमास मुलाणी यांचा सत्कार करून त्यांना भावीकार्यास शुभेच्छा दिल्या.
प्रास्ताविक प्रवीण घाडगे यांनी केले. स्वागत वैशाली मतकर यांनी केले. आभार अरुण घोरपडे यांनी मानले. याप्रसंगी संतोष जगताप, निर्मला जगदाळे, शाबिरा मुल्ला यांनी अलमास मुलाणी यांच्या कार्याबद्दल मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी शिक्षक संघाच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षा स्वाती चव्हाण, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख मालन गुजर, संतोष जगताप, प्रवीण घाडगे, अरुण घोरपडे, संतोष गायकवाड, किशोर मतकर, बाळकृष्ण पवार, वैभव डांगे, राजेंद्र देशमाने, प्रमोद बावकर, शांताराम वाघ, राजेंद्र शेडगे, सारिका डांगे, वैशाली मतकर, निर्मला जगदाळे, योगिनी पवार, आदी मान्यवर उपस्थित होते.
----
फोटो मजकूर - अलमास मुलाणी यांचा सत्कार करताना दादा सरकाळे. समवेत शाबिरा मुल्ला, स्वाती चव्हाण, प्रवीण घाडगे, संतोष जगताप, आदी मान्यवर.