‘माझी वसुंधरा अभियान’मध्ये जिल्हा प्रशासनाचे यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:28 IST2021-06-05T04:28:08+5:302021-06-05T04:28:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : माझी वसुंधरा अभियानांतर्गत २०२०-२१ मध्ये भूमी, वायू, अग्नी, आकाश आदी निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वावर आधारित ...

‘माझी वसुंधरा अभियान’मध्ये जिल्हा प्रशासनाचे यश
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : माझी वसुंधरा अभियानांतर्गत २०२०-२१ मध्ये भूमी, वायू, अग्नी, आकाश आदी निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वावर आधारित स्थानिक स्वराज्य संस्थांची स्पर्धा झाली. या स्पर्धेत उत्कृष्ट काम केल्याबद्दल सातारा जिल्ह्याचा शनिवारी आॅनलाइन सन्मान होणार आहे. हा सन्मान जिल्हाधिकारी शेखर सिंह आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा हे स्वीकारणार आहेत.
या अभियानात विभागस्तरावरील कामगिरीबाबत विभागीय आयुक्तांचा, तर जिल्हास्तरावरील सर्वोत्तम कामगिरीबाबत जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा सन्मान करण्यात येतो. त्यानुसार या अभियानाकडून सातारा जिल्ह्याला अभिनंदनाचे पत्र प्राप्त झाले आहे. या स्पर्धेचा सन्मान सोहळा शनिवार, दि. ५ जून रोजी ‘जागतिक पर्यावरण दिन’ या दिवशी दुपारी साडेबारा वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकासमंत्री तसेच महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ आदींच्या उपस्थितीत होणार आहे.