गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांची ससेहोलपट

By Admin | Updated: April 10, 2015 23:39 IST2015-04-10T21:27:06+5:302015-04-10T23:39:42+5:30

मसूर येथील प्रकार : ग्राहकांचे विक्रेत्यांना निवेदन

Subscribers to Gas Cylinders | गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांची ससेहोलपट

गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांची ससेहोलपट

कऱ्हाड : वेळेवर नोंदणी करूनदेखील गॅस सिलिंडर मिळत नसल्याने मसूर परिसरातील सिलिंडरधारक ग्राहकांकडून संताप व्यक्त होत आहे. याबाबत ग्राहकांकडून ओलम्पिका गॅस एजन्सीकडे अनेक वेळा तक्रार करून देखील एजन्सीकडून कोणतीच कार्यवाही केली जात नाही. याचा सर्वसामान्य गॅस सिलिंडरधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मसूर भागातील लोकांसाठी ओलम्पिका गॅस एजन्सीकडून गॅस सिलिंडर पुरवठा केला जातो. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून एजन्सीकडून ग्राहकांना गॅससिलिंडर पुरवण्याबाबत टाळाटाळ केली जात आहे. या प्रकाराबाबत ग्राहकांकडून एजन्सीतील विक्रेत्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी लीलादेवी सावंत, प्रमोद सावंत, नितीन कांबळे, महादेव बुरुंजले, संतोष कुंभार, महादेव गावडे, संजय पवार, रमेश माने, रंजना कुंभार, सचिन कुंभार आदींची उपस्थिती व सह्या निवेदनावर होत्या. सुमारे तीसहून अधिक ग्राहकांकडून एजन्सीकडे सिलिंडर पुरवठ्याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे. वारंवार तक्रारी करून तसेच नोंदणी करून देखील जादा पैैशाची आकारणी करत वेळेवर सिलिंडर देत नसल्याने याबाबत योग्य प्रकारे कार्यवाही करावी, असे ग्राहकांकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी) गॅस सिलिंडर एजन्सीने सिलिंडरच्या नोंदणीसाठी टोल-फ्री क्रमांक दिला आहे. त्यावर नोंदणी करून देखील आठ दिवस उलटूनही एजन्सीकडून सिलिंडर देण्यात आला नाही. त्याबाबत एजन्सीला विचारले असता असून, दोन दिवस तरी सिलिंडर मिळणार नाही, असे सांगण्यात आले. - प्रमोद सावंत, ग्राहक उपलब्ध झाल्यास सिलिंडर मिळेल प्लॅन्टमध्ये कच्च्या मालाचा तुटवडा असल्या कारणाने येणाऱ्या सिलिंडरच्या गाड्यांमध्ये विस्कळीतपणा आला आहे. तरी आपणास होणाऱ्या त्रासाबद्दल क्षमा असावी. सिलिंडर उपलब्ध होतील तेव्हा ग्राहकांना देण्याचा प्रयत्न करू, असे ओलम्पिका गॅस एजन्सीमधील अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Subscribers to Gas Cylinders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.