शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

बोंडारवाडी धरण प्रकल्पाचा परिपूर्ण प्रस्ताव शासनाकडे सादर करा  :अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2021 15:46 IST

Ajit Pawar Shivendrasinghraja Bhosale Satara area -जावली तालुक्यातील ५४ गावांचा पाणी प्रश्‍न सोडवण्यासाठी बोंडारवाडी धरण प्रकल्प मार्गी लागणे अत्यावश्यक आहे. हा प्रकल्प मार्गी लागावा यासाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मागणीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जलसंपदा आणि पाणीपुरवठा विभागाची महत्वाची बैठक बोलावली.

ठळक मुद्देबोंडारवाडी धरण प्रकल्पाचा परिपूर्ण प्रस्ताव शासनाकडे सादर करा  :अजित पवारशिवेंद्रसिंहराजेंच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांना केल्या सूचना

सातारा : जावली तालुक्यातील ५४ गावांचा पाणी प्रश्‍न सोडवण्यासाठी बोंडारवाडी धरण प्रकल्प मार्गी लागणे अत्यावश्यक आहे. हा प्रकल्प मार्गी लागावा यासाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मागणीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जलसंपदा आणि पाणीपुरवठा विभागाची महत्वाची बैठक बोलावली.

या बैठकीत पवार यांनी बोंडारवाडी धरण प्रकल्पाचा परिपूर्ण प्रस्ताव येत्या महिनाभरात तयार करून शासनाकडे सादर करण्याच्या सूचना जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या. दरम्यान, प्रस्ताव तयार करण्यासाठी लागणारी १५ लाख रुपये रक्कम डीपीडीसीमधून जलसंपदा विभागाला देण्याची सूचनाही त्यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना केली.जावली तालुक्यातील बोंडारवाडी धरण प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरु आहे. चालू अधिवेशनदरम्यान आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी अजित पवार यांना बोंडारवाडी धरण प्रकल्पाबाबत बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली. तसे लेखी पत्रही त्यांना दिले होते. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीवरून पवार यांनी बोंडारवाडी प्रकल्पासंदर्भात जलसंपदा आणि पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक लावली.या बैठकीला पाणीपुरवठा व स्वच्छता खात्याचे राज्यमंत्री संजय बनसोडे, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. शशिकांत शिंदे यांच्यासह पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे, जलसंपदा विभागाचे सचिव एस. के. घाणेकर, सातारा विभागाचे अधीक्षक अभियंता प्रकाश मिसाळ यांच्यासह संबंधित सर्व अधिकारी उपस्थित होते.जावली तालुक्यातील ५४ गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी बोंडारवाडी धरण प्रकल्प तातडीने मार्गी लागणे आवश्यक असल्याचे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सांगितले. बैठकीत बोंडारवाडी धरण प्रकल्पाबाबत ना. पवार यांनी सविस्तर आढावा घेतला. बोंडारवाडी धरण प्रकल्पाचा परिपूर्ण प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना त्यांनी जलसंपदा विभागाला केल्या.

दरम्यान, प्रस्ताव तयार करण्यासाठी १५ लाख रुपये खर्च अपेक्षित असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यावर ना. पवार यांनी १५ लाख रुपये तातडीने डीपीडीसीमधून जलसंपदा विभागाला देण्याची सूचना साताऱ्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना केली. त्यामुळे प्रस्ताव तयार करण्यासाठी कोणतीही अडचण राहणार नाही.

येत्या महिनाभरात बोंडारवाडी धरण प्रकल्पाचा परिपूर्ण प्रस्ताव तयार करून तो मंजुरीसाठी शासनाकडे सादर करा अशा सूचना ना. पवार यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या पाठपुराव्यामुळे बोंडारवाडी धरण प्रकल्पाचा प्रस्ताव येत्या महिनाभरात तयार होऊन शासनाकडे सादर होण्याचा मार्ग यामुळे मोकळा झाला आहे.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारShivendrasinghraja Bhosaleशिवेंद्रसिंहराजे भोसलेSatara areaसातारा परिसर