विद्यार्थ्यांनी श्रमदानातून दिली वसंतगडाला झळाळी...

By Admin | Updated: February 9, 2015 00:41 IST2015-02-08T23:53:43+5:302015-02-09T00:41:55+5:30

चार लाखांचे काम : दोन दिवसात गडाचं रूपडं बदललं

Student's work lightens to Vasantgad ... | विद्यार्थ्यांनी श्रमदानातून दिली वसंतगडाला झळाळी...

विद्यार्थ्यांनी श्रमदानातून दिली वसंतगडाला झळाळी...

मल्हारपेठ : कऱ्हाड तालुक्यातील किल्ले वसंतगडावर येथील बापूजी साळुंखे महाविद्यालय राष्ट्रीय सेवा दलाच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती संभाजीराजे गड-किल्ले संवर्धन संघ यांच्या सहकार्याने स्वच्छता मोहीम राबवून दोन दिवसांत गडावर चार लाखांचे काम पूर्ण केले. दोन दिवसात गडावरील ऐतिहासिक वास्तूंची सफाई करून विद्यार्थ्यांनी श्रमदानातून गडाला झळाळी देण्याचे काम केले.वसंतगडावर दोन दिवस संवर्धन कॅम्प आयोजित करण्यात आला होता. यामध्ये विद्यालयाचे नव्वद विद्यार्थी व संघाचे चाळीस कार्यकर्ते सहभागी झाले होते. कॅ म्पसाठी रणजित जाधव, अ‍ॅड. विजय जाधव यांनी अर्थसाह्य केले. दोन दिवस संघाच्या वतीने मनोरंजन व प्रबोधनाचे काम केले. यावेळी काले, ता. कऱ्हाड येथील जयमल्हार मंडळाने दांडपट्ट्याची चित्तथरारक प्रात्यक्षिके दाखविली. तसेच प्रदीप पाटील यांनी संभाजीराजेंचे चरित्र कथन केले. अक्षय नलवडे यांनी स्त्री व आजचा युवक याविषयी मार्गदर्शन केले. प्रांजली मोहिते यांनी शिवकार्य यामध्ये मुलींचा सहभाग याविषयी मत मांडले. विद्यालयाचे मोहिते यांनी वसंतगडाचे ऐतिहासिक महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले.विद्यालयाचे एन. व्ही. शिंदे, पी. डी. पाटील, डॉ. जे. ए. म्हेत्रे, एम. व्ही. पाटील व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले. या अभियानासाठी ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले. संघाचे अ‍ॅड. अमित नलवडे, नीलेश यादव, संतोष साळुंखे, विराज पाटील, वैभव पाटील, रामचंद्र माळी, नीलेश पाटील, अजित करंदीकर यांचे सहकार्य केले. (वार्ताहर)

अशी केली गडावरील स्वच्छता
कोयना तळ्यातील काटेरी झुडपे काढली
तळ्याच्या बाजूला तट बांधला
सतीशिळा स्वच्छ केल्या
चुन्याच्या घाण्याची डागडुजी केली
कृष्णा तळ्यावर तब्बल ३६ फूट लांब, १३ फूट रुंद आणि १८ फूट खोलीचा मोठा बंधारा बांधण्यात आला. तसेच गडावर लावण्यात आलेल्या सहाशे डाळिंब व आंब्यांच्या झाडांना मातीची भर घालण्यात आली. गडाच्या तटबंदी व बुरुजावरील झाडेझुडपे नष्ट करून गडाला झळाळी देण्याचे काम करण्यात आले. गडाच्या मध्यभागी असणाऱ्या चंदोबाच्या मंदिराकडे जाणाऱ्या पन्नास फूट लांब रस्त्यावर दगड, माती टाकून रुंदीकरण करण्यात आले.

Web Title: Student's work lightens to Vasantgad ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.