विद्यार्थ्यांनी आयुष्यात येणाऱ्या संधीचे सोने करावे : रणजित शेवाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:46 IST2021-09-04T04:46:15+5:302021-09-04T04:46:15+5:30
मलकापूर : ‘शालेय जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करा. पालक व शिक्षक हेच खरे विद्यार्थ्यांचे हितचिंतक असतात. त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे ...

विद्यार्थ्यांनी आयुष्यात येणाऱ्या संधीचे सोने करावे : रणजित शेवाळे
मलकापूर : ‘शालेय जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करा. पालक व शिक्षक हेच खरे विद्यार्थ्यांचे हितचिंतक असतात. त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे वाटचाल केल्यास यश हमखास मिळतेच. त्यांच्या पाठिंब्याच्या जोरावर विद्यार्थ्यांनी आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संधीचे सोने करावे,’ असे प्रतिपादन रोटरी इंटरनॅशनलचे डिस्ट्रिक्ट डायरेक्टर रणजित शेवाळे यांनी केले.
येथील आदर्श ज्युनियर कॉलेजमध्ये बारावी कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील गुणवंत विद्यार्थी आणि पालकांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त प्राध्यापक मारुती डाके होते. यावेळी संस्थेचे सचिव अशोकराव थोरात, सलीम मुजावर, पी. जी. पाटील, बी. बी. पाटील, तुळशीराम शिर्के, संजय थोरात, हर्षाली पाटील, परविन बागवान, संभाजी पांढरपट्टे, सुनंदा गाडे, राजश्री शेटे, दिलीप पाटील, धनंजय खंडागळे, मीना धोंगडे, उपमुख्याध्यापक अनिल शिर्के, आर. आर. पाटील, पालक, ग्रामस्थ उपस्थित होते.
मारुती डाके म्हणाले, ‘शारीरिक, मानसिक विकासाबरोबरच भावनिक विकास होण्याची गरज आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत योगा अभ्यास, संतुलित आहाराकडेही अधिक लक्ष द्यावे. येणारा काळ आपल्यासमोर विविध आव्हाने घेऊन येत आहे. त्याला सामोरे जाण्याची तयारी आपल्यामध्ये असली पाहिजे.’
अशोकराव थोरात म्हणाले, ‘विद्यार्थ्यांनी आपली स्वयंगुणवत्ता सिद्ध करावी. कोरोनामुळे शिक्षण क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वयंअध्ययनावर अधिक भर द्यावा.’
प्राचार्य एस. वाय. गाडे यांनी प्रास्ताविक केले. आर. डी. पाटील व एस. डी. खंडागळे यांनी सूत्रसंचालन केले. एस. डी. पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.
०३मलकापूर
येथील आदर्श ज्युनियर कॉलेजमध्ये बारावी कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील गुणवंत विद्यार्थी आणि पालकांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता. (छाया : माणिक डोंगरे)
030921\img_20210903_154904.jpg
फोटो कॕप्शन
येथील श्रीमळाईदेवी शिक्षण संस्था संचलित आदर्श ज्युनियर कॉलेजमध्ये इयत्ता बारावी कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील गुणवंत विद्यार्थी आणि पालकांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता. (छाया-माणिक डोंगरे)