विद्यार्थ्यांनी स्वत:बरोबर इतरांनाही शिक्षित करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:23 IST2021-09-02T05:23:04+5:302021-09-02T05:23:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शिरवळ : इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी घरातील सर्वांसोबत इंग्रजीमध्ये संवाद करून त्यांनाही इंग्रजी शिकवावे व पयार्याने गाव ...

विद्यार्थ्यांनी स्वत:बरोबर इतरांनाही शिक्षित करावे
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरवळ : इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी घरातील सर्वांसोबत इंग्रजीमध्ये संवाद करून त्यांनाही इंग्रजी शिकवावे व पयार्याने गाव साक्षर होण्यासाठी मदत करावी, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले यांनी केले.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी या इंग्लिश मिडियम स्कूलच्या दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन सोहळा आज उत्साहात पार पडला. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, खंडाळा पंचायत समितीचे सभापती राजेंद्र तांबे, शिरवळच्या सरपंच लक्ष्मी पानसरे तसेच शाला समितीचे सदस्य विनय चाटी उपस्थित होते.
यावेळी बारावीचे धनश्री खानविलकर, चैताली निगडे, प्रशांत शिंदे, श्रद्धा रावळ, विनय राकसे, आसिया पठाण, मृणाल ताकमोगे. तर दहावीतील अमिता देशपांडे, साई जाधव, श्रुती सातकर, आदित्य परब, साची बोटे, तन्मय वाघ, निशांत कोंडे यांचा सत्कार करण्यात आला.
खंडाळा पंचायत समितीचे सभापती राजेंद्र तांबे, शाला समितीचे सदस्य विनय चाटी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सुरुवात सरस्वती स्तवनाने झाली. त्यानंतर प्रास्ताविक राजश्री गोरे यांनी केले. सूत्रसंचालन विनोद मोहिते यांनी केले. मुख्याध्यापिका स्वाती जोशी व सामाजिक कार्यकर्ते सागर पानसरे यावेळी उपस्थित होते.
....................