कोरोनाबाबत विद्यार्थ्यांची काळजी घ्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:14 IST2021-02-05T09:14:09+5:302021-02-05T09:14:09+5:30
वाघेश्वर-मसूर, ता. कऱ्हाड येथील प्राथमिक शाळेत शिक्षकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी सह्याद्री कारखान्याचे संचालक लहुराज जाधव, प्राथमिक ...

कोरोनाबाबत विद्यार्थ्यांची काळजी घ्यावी
वाघेश्वर-मसूर, ता. कऱ्हाड येथील प्राथमिक शाळेत शिक्षकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी सह्याद्री कारखान्याचे संचालक लहुराज जाधव, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश लोखंडे, प्रा. कादर पिरजादे, केंद्रप्रमुख नसीमा संदे, ग्रामसेवक सुभाष कुंभार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश क्षीरसागार यांची प्रमुख उपस्थिती होती.
यादिवशी शाळेच्या प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने डॉ. रमेश लोखंडे यांनी विद्यार्थ्यांचे थर्मल गणने तापमान व ऑक्सिजन पातळी तपासणी केली. विद्यार्थ्यांना सॅनिटायझर देऊनच वर्गात प्रवेश देण्यात आला. सर्व शिक्षकांच्या कोरोना चाचणीच्या निगेटिव्ह आलेल्या प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी वाघेश्वर ग्रामपंचायतीच्या वतीने प्रत्येक वर्गाला एक थर्मल गण, ऑक्सिमीटर, सॅनिटायझर देण्यात आले.
दुर्योधन कुलेकर यांनी स्वागत केले. मनोजकुमार कुलकर्णी यांनी आभार मानले.
फोटो : ३१केआरडी०५
कॅप्शन : वाघेश्वर, ता. कऱ्हाड येथील प्राथमिक शाळेत शिक्षक व विद्यार्थ्यांचे स्वागत शिक्षण व अर्थ समिती सभापती मानसिंगराव जगदाळे यांनी केले. डॉ. रमेश लोखंडे, लहुराज जाधव, कादर पिरजादे आदी उपस्थित होते.