विद्यार्थ्यांनी वाचविले दोन लाख : भुर्इंज येथे आधुनिक गुरुदक्षिणेचा नवा आदर्श; कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय झाले चकाचक

By Admin | Updated: March 18, 2015 00:06 IST2015-03-17T22:59:28+5:302015-03-18T00:06:57+5:30

रंगकाम करणाऱ्या कारागीरांप्रमाणे करुन सुमारे २ लाख रुपये वाचविले आहेत. या कृतीतून विद्यार्थ्यांना आयुष्यभराची कलाही अवगत झाली असून खऱ्या अर्थाने त्यांनी जीवन शिक्षण येथे प्राप्त केले

Students saved two lakhs: Modern model of modern Gurudakshine at Bhurang; Karmaveer Bhaurao Patil Vidyalaya became a pomp | विद्यार्थ्यांनी वाचविले दोन लाख : भुर्इंज येथे आधुनिक गुरुदक्षिणेचा नवा आदर्श; कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय झाले चकाचक

विद्यार्थ्यांनी वाचविले दोन लाख : भुर्इंज येथे आधुनिक गुरुदक्षिणेचा नवा आदर्श; कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय झाले चकाचक

भुर्इंज : रयत शिक्षण संस्थेच्या भुर्इंज येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातील विद्यार्थ्यांनी लाखमोलाची अनोखी कामगिरी बजावत शाळामाउलीच्या सेवेत कर्तव्याचे रंग भरले आहेत. नवीन इमारतीतील तब्बल २७ खोल्यांचे रंगकाम सराईत रंगकाम करणाऱ्या कारागीरांप्रमाणे करुन सुमारे २ लाख रुपये वाचविले आहेत. या कृतीतून विद्यार्थ्यांना आयुष्यभराची कलाही अवगत झाली असून खऱ्या अर्थाने त्यांनी जीवन शिक्षण येथे प्राप्त केले आहे.अनोख्या उपक्रमांचे रोल मॉडेल म्हणून या शाळेकडे पाहिले जाते. विद्यार्थ्यांनी केलेली ही लाखमोलाची कामगिरी या वाटचालीतील पुढचे पाऊल ठरले आहे. प्रार्थनेच्यावेळी प्राचार्य पाटील यांनी इयत्ता पाचवी ते नववीतील विद्यार्थ्यांना या कामासाठी आवाहन केले.दहावीचे वर्ष महत्त्वाचे असल्याने या वर्गातील विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी करुन घेतले नाही. जे विद्यार्थी स्वत:हून तयार झाले त्या विद्यार्थ्यांचे ६ ते ७ जणांचे गट तयार करण्यात आले. ५ हजार रुपये खर्च करुन रंगकाम करण्यासाठीचे साहित्य आणण्यात आले. कलाशिक्षक राऊत व वालेकर यांनी रंगकामाचे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले. प्रथम शाळेच्या भिंती धुवून काढल्या. त्यानंतर घासून त्यात पुट्टी भरून भिंती आॅईलनबाँड कलरने रंगविण्यात आल्या. सरासरी दोन दिवसात एक वर्ग रंगवून झाला. वर्गखोल्यांसोबत व्हरांडा, जीने, पायऱ्या याचेही आकर्षक रंगकाम विद्यार्थ्यांनीच केले. प्रत्येक खोलीला वेगळा रंग देण्यात आला आहे. कला शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी केलेले काम पाहिल्यानंतर त्याचा दर्जा इतका उच्च आहे की, हे एवढे मोठे काम चिमुकल्या हातांनी साकारले आहे, यावर विश्वास बसणे अवघड जाते. (वार्ताहर)


श्रमाला कलेची जोड
देणगीदारांच्या मदतीतून नवीन शाळेची इमारत उभी राहिली; मात्र या इमारतीतील २७ खोल्यांचे रंगकाम करण्याचा खर्च परवडत नव्हता. त्यामुळे प्राचार्य आर. एस. पाटील यांनी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन हे काम करण्याची कल्पना कलाशिक्षक एस. पी. राऊत आणि टी. डी. वालेकर यांच्यासमोर मांडली. राऊत आणि वालेकर यांनी ही कल्पना उचलून धरली. त्यांनी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले. शिक्षकांच्या कलेला विद्यार्थ्यांच्या श्रमाची जोड मिळाली अन् शाळेचे रूप बदलून गेले.


उत्स्फूर्त प्रतिसाद
सुरुवातीला जेव्हा आम्ही या कल्पनेचा विचार केला तेव्हा त्याला कितपत प्रतिसाद मिळेल याबाबत शंका होती. पण विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे प्रत्येक खोलीतील रंगाची शेड वेगळी आहे. स्वत:च रंगकाम केल्याने भिंती खराब होऊ नयेत याचे नैतिक भान आणि जबाबदारी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली आहे. या कामात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना रंगकामाबाबत कोणतीही माहिती विचारा ते धडाधड एखाद्या सराईत कारागीराप्रमाणे माहिती देतील.
- आर. एस. पाटील, प्राचार्य
विद्यार्थ्यांचा सन्मान करणार
भुर्इंज येथील या विद्यालयाने विद्यार्थी घडवलेच याशिवाय त्यांना योग्य वातावरण मिळावे, यासाठी नेहमीच प्रयत्न केले आहेत. या प्रयत्नातून हे शैक्षणिक संकुल उभे राहिले आहे. या उभारणीत २७ खोल्या व परिसराचे रंगकाम विद्यार्थ्यांनी करुन सुमारे दोन लाख रुपये वाचविले आहेत. या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
- भैय्यासाहेब जाधवराव,
सदस्य, रयत शिक्षण संस्था

Web Title: Students saved two lakhs: Modern model of modern Gurudakshine at Bhurang; Karmaveer Bhaurao Patil Vidyalaya became a pomp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.