विद्यार्थ्यांना लाभले सिंंधुतार्इंचे संस्कार
By Admin | Updated: January 23, 2015 23:38 IST2015-01-23T20:15:40+5:302015-01-23T23:38:08+5:30
जगामध्ये इंग्रजी भाषेला महत्त्व असून, इंग्रजी ही जागतिक व व्यावसायिक भाषा असून, विद्यार्थ्यांनी ती आत्मसात करणे गरजेचे आहे.

विद्यार्थ्यांना लाभले सिंंधुतार्इंचे संस्कार
कऱ्हाड : ‘विद्यार्थ्यांत आत्मविश्वास निर्माण करणाऱ्या शिक्षणव्यवस्थेची गरज असून ‘कृष्णा’सारख्या संस्थांनी ती संधी विद्यार्थ्यांसाठी निर्माण केली आहे. येथून घडणारे विद्यार्थ्यी हे जिद्द चिकाटी व स्वकर्तृत्वावर विश्वास ठेवून यशाचे पाईक असतील,’ असा विश्वास ‘अनाथांची माई’ सिंधुताई सपकाळ यांनी व्यक्त केला. येथील कृष्णा इंग्लिश मीडियम स्कूल व जुनिअर कॉलेज वाठारच्या वार्षिक स्रेहसंमेलनामध्ये त्या बोलत होत्या.सपकाळ म्हणाल्या, ‘आई-वडील आपल्या मुलांसाठी अहोरात्र कष्ट करत असतात़ त्यासाठी मुलांनी आदर सेवाभाव ही वृत्ती ठेवून त्यांच्या ॠणातून उतरायी व्हावे़’ अशी आर्त हाक त्यांनी यावेळी दिली़ त्याचबरोबर आपल्या जीवनातील काही अनुभव सांगत उपस्थितांशी संवाद साधला.उपविभागीय पोलीस अधिकारी मितेश घट्टे म्हणाले, ‘कृष्णा फाउंडेशनने वाठार येथे एक भव्य शैक्षणिक संकुल तयार केले आहे़ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणाची उपलब्धता करून देऊन येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा मिळवून दिल्या आहेत. जगामध्ये इंग्रजी भाषेला महत्त्व असून, इंग्रजी ही जागतिक व व्यावसायिक भाषा असून, विद्यार्थ्यांनी ती आत्मसात करणे गरजेचे आहे.’
संचालक प्रा. विनोद बाबर व मान्यवरांच्या हस्ते विविध स्पर्धांमध्ये यश प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात कृष्णा इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका गौरी बानगुडे यांनी संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, डॉ. अतुल भोसले, गौरवी भोसले, महेश सटवे तसेच प्रा. विनोद बाबर यांच्याकडून वेळोवेळी मार्गदर्शन मिळत असल्याचे सांगितले. प्रा. धनश्री पवार, व्ही. एस. पाटील. उपस्थित होते. शैलेजा डोळ यांनी आभार मानले़ (प्रतिनिधी)