शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अतिदुर्गम भागातील विद्यार्थी थेट सफरचंदाच्या बागेत!, पाहणी करून घेतले लागवडीचे धडेही

By प्रगती पाटील | Updated: April 18, 2023 15:40 IST

चक्क दुष्काळी भागात फुलवली सफरचंदाची बाग

सातारा :  आपला देश हा कृषिप्रधान आहे पण प्रांतिक अडथळ्यांमुळे अनेक फळांची झाडे विद्यार्थ्यांना पाहता येत नाहीत. हे लक्षात घेऊन अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांनी चक्क दुष्काळी भागात फुललेली सफरचंदाच्या बागेचा दौरा केला. शेती कशी असावी, बाग कशी ठेवावी, स्वच्छता सगळंच विद्यार्थ्यांना पाहण्यासारखं आणि शिकण्यासारखं होतं. परिस्थितीमुळे हिमालय अन् जम्मु-काश्मीरला जाणं शक्य नसणाऱ्या या विद्यार्थ्यांना क्षेत्रभेटीच्या निमित्ताने शेतीतील नवीन प्रयोगही अनुभवता आले.सातारा जिल्हा परिषदेची माण तालुक्यातील अतिदुर्गम भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दरावस्ती (टाकेवाडी) या शाळेतील विद्यार्थ्यांना क्षेत्र भेटीसाठी जम्मु-कश्मिर किंवा हिमालयात नव्हे तर चक्क अतिदुर्गम भागातील टाकेवाडी गावचे बागायतदार शेतकरी जालिंदर दडस यांनी लावलेल्या सफरचंदाच्या बागेस भेट दिली. दुष्काळी माळरानावर सफरचंदाची बाग बघून लेकरं हरकली. लागवडीच्या धड्यांसह सफरचंदाचाही आस्वादही मुलांनी घेतला.सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माण तालुक्यातच सफरचंदाची बाग विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष दाखवली. मुख्याध्यापक अशोक गोरे व उपक्रमशील शिक्षिका भारती ओंबासे यांनी  या सहलीचे आयोजन केले होते. बाजारात विक्रीस येणारे सफरचंद झाडावर दिसते कसे? त्याचे झाड असे असते? या विद्यार्थ्यांच्या कुतूहलाचे शमन प्रत्यक्ष स्व-अनुभवातील शिक्षणाने विद्यार्थ्यांना मिळाले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरzpजिल्हा परिषदStudentविद्यार्थी