बनावट नोटा बाळगणाऱ्या टोळीला अटक
By Admin | Updated: November 30, 2014 00:31 IST2014-11-30T00:31:12+5:302014-11-30T00:31:41+5:30
एलसीबीची कारवाई : साडेपाच लाखांचे चलन, बांग्लादेशच्या भागातून आणल्याचा संशय

बनावट नोटा बाळगणाऱ्या टोळीला अटक
सातारा : बनावट नोटा चालविण्यासाठी साताऱ्यात फिरणाऱ्या पाचजणांच्या मुसक्या स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या. त्यांच्याकडून पाच लाख ४३ हजार ५०० रुपयांचे बनावट चालन जप्त करण्यात आले आहे. त्यांनी या नोटा बांग्लादेशच्या भागातून आणल्याची प्राथमिक माहिती आहे.
शनिवारी सकाळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना साताऱ्यात राधिका रस्त्यावर चार ते पाच जण बनावट नोटा चालवित असल्याचे समजल्यानंतर पोलीस निरीक्षक घनवट व कर्मचारी संबंधित ठिकाणी गेले. त्यावेळी तेथील एका गॅस एजन्सीजच्या समोर पाचजण संशयास्पद स्थितीत उभे असल्याचे दिसून आले. यावेळी त्यांच्याकडे पाच लाख ४३ हजार ५०० रुपयांचे बनावट चलन आढळून आले.
रणजित जितेंद्र बिश्वास (वय ३२, रा. कमछलबेरीया, जि. नदिया पश्चिम बंगाल. सध्या रा. नेरे, हिंजवडी, पुणे), खंडाप्पा बळीराम तुगावे (वय २९, रा. मंगळूर, ता. औसा, जि. लातूर. सध्या रा. नेरे-दत्तवाडी, हिंजवडी पुणे), राहुल अण्णाराव सुरवसे (वय २४, रा. राणी अंकुलगा, ता. शिरुर अनंतपाळ, जि. लातूर. सध्या रा. नेरे, दत्तवाडी पुणे), ज्ञानेश्वर भानुदास कसबे (वय २३, रा. हेळंब, ता. देवणी, जि. लातूर. सध्या रा. नेरे-दत्तवाडी पुणे) आणि अनिकेत मनोहर सूर्यवंशी (वय १९, रा. हेळंब, जि. लातूर सध्या रा. वडगावशेरी, पुणे) अशी त्यांची नावे आहेत.
कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक विकास जाधव, कुमार घाडगे, सहायक फौजदार प्रताप जाधव, पृथ्वीराज घोरपडे, सुरेंद्र पानसांडे, मोहन घोरपडे, संजय पवार, विजय शिर्के, संजय शिंदे, दीपक मोरे, उत्तम दबडे, काका कदम, विजय कांबळे, शरद बेबले, संजय वाघ, विजय सावंत, कांतिलाल नवघणे, नितीन भोसले, महेश शिंदे, रामचंद्र गुरव, मुबीन मुलाणी, प्रवीण शिंदे, यांनी सहभाग घेतला. (प्रतिनिधी)