जिद्दी अक्षयने आयुष्याला दिली गती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 22:47 IST2019-06-29T22:47:36+5:302019-06-29T22:47:42+5:30
सागर गुजर । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : अवघा दहा वर्षांचा असताना अचानकपणे त्याला अपंगत्व आले. शरीरात आकडी भरली. ...

जिद्दी अक्षयने आयुष्याला दिली गती
सागर गुजर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : अवघा दहा वर्षांचा असताना अचानकपणे त्याला अपंगत्व आले. शरीरात आकडी भरली. धावपळ करणारा, गतीने सर्व कामे करणाऱ्या त्याची गती मंदावली. अक्षय माने हे या मुलाचे नाव! आजच्या घडीला अक्षयने आजाराला कुरवाळत न बसता आपल्या भावाच्या व्यवसायाला हातभार लावलाय.
अपंगत्त्व आले म्हणून आजाराला कुरवाळत बसणारे अनेकजण आपण अवती-भवती पाहतो. मात्र, त्यावर मात करून पुढे जाणारे जिद्दी लोकही आपल्या नशिबाला दोष न देता कुटुंबाचा आधार होत असतात, त्यांच्या जिद्दीमुळे अनेकांना धीर मिळतो.
अक्षयला चौथीत असताना अचानकपणे आकडी आली. तो सातारा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिकत होता. दहा वर्षांचा अक्षय चौथीत असताना त्याची बोटे वाकडी झाली. पळणे थांबले वेगाने चालणे थांबले, रातांधळेपणा आला. या आजारावर उपचारांची लस
खर्चिक आहे. त्यासाठी वर्षाकाठी ३० ते ३५ लाख रुपये खर्च आहे. लाखात एखाद्याला असा आजार जडतो. संपूर्ण महाराष्ट्रात केवळ ७० लोकांना असा आजार असल्याचे त्याच्या वडिलांनी सांगितले.
दरम्यान, वर्षभरापूर्वी अक्षयला ५९ टक्के अपंगत्वाचा दाखला मिळाला आहे. शारीरिक व्याधीमुळे सामान्य लोकांप्रमाणे जरी
वेगाने कामे जमत नसली तरी अक्षय आपल्या भावाच्या व्यवसायात त्याला मदत करत आहे.
आॅनलाईन जाहिरातींचे काम तो मोबाईल व लॅपटॉपच्या माध्यमातून करतो. त्याने स्वत:ला सतत कार्यमग्न ठेवले आहे.
उपचारासाठी वडिलांचे प्रयत्न
मुलाला जडलेला आजार बरा करण्यासाठी दिलीप माने यांनी अनेक प्रयत्न केले. साताºयातील दवाखान्यांमध्ये उपचार केले गेले; परंतु या आजारावर इथे उपचार होत नसल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर माने यांनी पुण्यातील दिनानाथ मंगेशकर, रुबी आदी दवाखान्यांमध्ये उपचारासाठी प्रयत्न केले. उपचाराचा काहीच फायदा झाला नाही. दरम्यान, यासाठी लागणाºया पुढील उपचाराचा खर्च वर्षाकाठी ३५ ते ४० लाख असल्याने महाराष्ट्रातील पालकांतर्फे शासनाला प्रस्ताव दिलाय.