संघर्ष ज्योत परळीकडे रवाना

By Admin | Updated: December 11, 2014 23:52 IST2014-12-11T21:39:43+5:302014-12-11T23:52:52+5:30

स्मरण गोपीनाथ मुंडेंचे : शिखर शिंगणापूरच्या शंभू महादेवाला नमन करून प्रारंभ

The struggle flows to the flames | संघर्ष ज्योत परळीकडे रवाना

संघर्ष ज्योत परळीकडे रवाना

पळशी : भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कार्याचे स्मरण करण्यासाठी आयोजित केलेल्या संघर्षज्योत उपक्रमास शिखर-शिंगणापूर येथून गुरुवारी प्रारंभ करण्यात आला.
भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गोपीनाथ मुंडे यांनी केलेली जनतेच्या व समाजाच्या हिताची कामे संघर्ष ज्योतद्वारे तेवत ठेवण्यासाठी गोपीनाथ मुंड यांचे कुलदैवत शिखर शिंगणापूर येथील शंभु महादेव मंदीर येथून परळी येथील गोपीनाथगडापर्यंत संघर्ष जयोत नेणार असल्याची माहिती संघर्ष ज्योतीचे आयोजक व सातारा जिल्हा भारतीय जनता मोर्चाचे सरचिटणीस डॉ. राजेंद्र खाडे यांनी शिंगणापूर येथे आज दिली.
डॉ. खाडे यांनी सांगितले, गोपीनाथ मुंडे यांनी जनतेसाठी समाजहिताची केलेली कामे तसेच सर्वसामान्यांच्या हितासाठी दिलेला लढा त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी स्वच्छ प्रशासन व सुशासनाद्वारे केलेल्या कामांची आठवण संघर्ष ज्योत तेवत ठेवण्यासाठी गोपीनाथ मुंडे यांचे कुलदैवत शिखर शिंगणापूर येथील शंभु महादेव येथून नेण्यात येत आहे. नातेपुते, माळशिरस, अकलुज, टेंभूर्णी, कुर्डवाडी, बार्शी, कळंब, अंबाजोगाई या मार्गाने परळीपर्यंतचा २५६ कि़ मी. चा प्रवास करून नेण्यात येत आहे. या संघर्ष ज्योत मध्ये सर्व समाजातील तरूण सहभागी झाले आहेत. सलग २९ तास धावत तरूण कार्यकर्ते ही ज्योत नेणार आहेत.
यावेळी कार्यकर्ते शिखर शिंगणापूर येथे तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील भाजपसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी डॉ. राजेंद्र खाउे, अ‍ॅड. दत्तात्रय हांगे, अमोल खाडे, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब खाडे, डॉ. काळे, तालुका उपाध्यक्ष संदीप बडवे, तालुकाध्यक्ष धीरज दवे, बाळासाहेब मासाळ, तुषारशेठ विरकर, विश्वास सावंत, छत्रपती भोसले, रामदास शिंदे, विजय साखरे, रवी मदने, विवेक खाडे, सूर्यकांत मदने आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संघर्ष ज्योतीची सांगता परळी येथे गोपीनाथ गडावर दि. १२ डिसेंबर रोजी राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत होणार आहे. (वार्ताहर)

Web Title: The struggle flows to the flames

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.